(image credit-calculator.org)

सर्वसाधारणपणे म्हातारपणाची लक्षणं दिसायला जेव्हा सुरूवात होते तेव्हा यामागे अनेक घटक कारणीभूत ठरतात. काही जणांना कमी वयात सुद्धा म्हतारपणाची लक्षणं दिसत असतात. याचं कारण म्हणजे आहार घेण्याच्या चुकीच्या पद्धती, वातावरणात  होणारे बदल आणि हार्मोन्समध्ये होत असलेला बदल यामुळे तुम्ही कमी वयातच म्हातारे दिसू लागता. शरीराच्या काही भागांवर वय वाढीची लक्षणं दिसायला सुरूवात होते. चला तर मग जाणून घेऊया शरीराच्या कोणच्या भागात वय वाठीची लक्षणं जाणवतात. तसंच या लक्षणांना कसं रोखता  येईल.

Image result for face old woman in small age
(imaage credit- blogpacoperperfumries.com)

स्तन आणि छातीचा भाग

Image result for cheast wrinkles

(image credit-littlethings)

रिसर्चनुसार स्त्रियांच्या छातीचा भाग, स्तनांवर वय वाढण्याची लक्षणं दिसू लागतात. कारण  त्यावेळी स्तन काही प्रमाणात लुज पडायला सुरूवात होते. जर तुमच्या शरीरावर अनावश्यक चरबी असेल तर तुमच्या छातीची त्वचा अशी दिसू शकते.  म्हणून जर तुम्ही तरूण वयात असतानाच व्यायाम करायला सुरूवात केली तर तुमची त्वचा लूज पडणार नाही.

डोळ्यांचा भाग

Image result for fae wrinkles
 (image credit-yahoo)

डोळ्याच्या आजुबाजूचा भाग ३५  ते ४० वयानंतर तुमची त्वचा तारूण्यातील त्वचेपेक्षा कमी तेज असलेली दिसते. हे सगळ्यात पहिले लक्षण आहे. जेव्हा तुमचा चेहरा पाहून ओळखता येतं की तुमचा चेहरा थकला आहे. ज्यावेळी तुमची व्यवस्थित झोप होत नसते. त्यावेळी  ही समस्या उद्भवत असते. त्यासाठी रोज ७ ते ८ तास झोप घेणं गरजेचं आहे. तसंच भरपूर पाणी प्यायल्याने सुद्दा बदल दिसून येतो.( हे पण वाचा-हिवाळ्यात सुंदर त्वचा मिळवण्यासाठी 'हे' फेसपॅक नक्की ठरतील फायदेशीर)

चेहरा आणि गाल 

Image result for fae wrinkles(image credit- faizabeautycream.com)

शरीरातील इतर अवयवांपेक्षा चेहरा आणि गालांवर  वय वाढीची लक्षणं जास्त दिसून येतात. याची सुरूवात सुरकुत्या, डाग आणि  फाईन लाईन्सने होत असते.  तुमच्या हावभावांवरून त्वचा लूज पडल्याचं दिसून येत. तसंच जर  तुम्हाला  या परिस्थितीपासून स्वतःला वाचवायचं असेल तर  दररोज सकाळी आणि संध्याकाळी मॉईश्चराईजर  लावून मग झोपणे फायदेशीर ठरेल. 

मान

मानेची त्वचा ही चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा जास्त पातळ असते. त्यामुळे मानेवर वयवाढीची लक्षणं कमी वयात येत असतात.  मानेची त्वचा लटकणे. त्वचेची मऊ त्वचा  आणि एजिंग  यांना रोखण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल व्यायम करू शकता. व्यायाम केल्यामुळे तुमच्या मानेची त्वचा लूज पडणार नाही. तसंच  हातांवर सुद्दा सुरकुत्या यायला सुरूवात होते. ज्यासाठी तुम्ही  पाणी खूप प्या आणि सनस्क्रिनचा वापर  करा. ( हे पण वाचा-केस गळती रोखण्यासाठी अनेक प्रयोग करून थकलात? तर आता मेथीच्या वापराने मिळवा नवे केस )

Web Title: How to prevent symptoms of old age on your face..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.