प्रदुषणामुळे कमी वयातच तुम्ही दिसू लागता म्हातारे, हे उपाय कराल तर रहाल फायद्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 02:42 PM2020-01-07T14:42:22+5:302020-01-07T14:49:01+5:30

दिवसेंदिवस वातावरणातील  प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे.

Know the disadvantages of pollution for skin | प्रदुषणामुळे कमी वयातच तुम्ही दिसू लागता म्हातारे, हे उपाय कराल तर रहाल फायद्यात

प्रदुषणामुळे कमी वयातच तुम्ही दिसू लागता म्हातारे, हे उपाय कराल तर रहाल फायद्यात

Next

दिवसेंदिवस वातावरणातील  प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे. सध्याच्या काळात प्रत्येक महिलेला कोणत्याना कोणत्या कारणासाठी घराबाहेर पडावं लागतं. त्यामुळे  वातावरणात असलेल्या प्रदुषणाचा परिणाम चेहरा आणि  शरीरावर सुद्धा होत असतो. तसंच महिला या मोठ्या प्रमाणात कॉस्मेटिक्सचा वापर करत असतात.  त्वचेवर होणारा  प्रदुषणाचा परिणाम  महागात सुध्दा पडू शकतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण  प्रदुषणाचा परिणाम तुमच्या त्वचेवर होऊन तुम्ही वेळेआधीच म्हातारे दिसू  शकता.  ही समस्या सुरूवातीला खूप लहान वाटते पण नंतर या समस्येचं रुपांतर मोठ्या त्वचेच्या आजारात होऊ शकतं.  चला तर मग जाणून घेऊया प्रदुषणाचा त्वचेवर कसा परिणाम घड़ून येतो.


 एक्झिमा 

प्रदुषणामुळे तुम्हाला एक्झिमा हा त्वचेचा आजार होऊ शकतो.  त्यामुळे त्वचेवर खाज, जळजळ होणे, रॅशेज येणे अशा समस्या उद्भवू शकतात.  या आजार तुमच्या त्वचेवर लहान आकाराचे पाण्याने भरलेले बारिक बारिक फोडं येतात आणि त्यामुळे खाज येते.  ती खाज अत्यंत तीव्र स्वरूपाची असते. त्यामुळे त्वचा लाल होते. 

म्हातारपण

प्रदुषणाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर  झाल्यास वेगवेगळ्या  समस्या उद्भवतात.  त्यामुळे  कमी वयात म्हातारपण आल्याचं सुध्दा दिसू शकतं चेहरा खराब ह्यायला सुरूवात होते.  यात एंन्टीएजिंगच्या खूणा  तसंच डोळ्यांखाली काळी वर्तुळ येऊ शकतात. त्यामुळे चेहरा निस्तेज होतो. सुरकुत्या येण्याची समस्या सुद्धा जास्त उद्भवते.

 त्वचेचा कोरडेपणा

जर तुम्हाला कामासाठी बाहेर पडत  असताना प्रदुषणाचा सामना करावा लागत असेल तर चेहरा कोरडा पडण्याची शक्यता असते. तसंच त्वचेवर पुळकूट्या येतात आणि चेहरा काळा पडतो. त्यानंतर पुन्हा आधीसारखी त्वचा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. 


 केस खराब होतात.

जर  तुम्ही कामासाठी बाहेर पडत असताना बाईक किंवा स्कूटी वापरत असल तर  प्रवास करत असताना कधी चुकूनही केस मोकळे ठेवू नका. जर तुम्ही केस मोकळे ठेवले तर  खराब होतात. शिवाय धुळीचे कण  केसांवर बसतात. तसंच  त्यामुळे चेहरा आणि त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो.  केस गळायला सुरूवात होते. आणि  केसात कोंडा होण्याची दाट शक्यता असते. 

वाढत्या प्रदुषणापासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी  त्वचेची काळजी घ्या.  चेहरा दिवसातून दोन ते तीनवेळा धुवा. याशिवाय जर तुम्ही त्वचेवर मेकअप करत असाल किंवा पावडर लावत असाल तर  आधी मेकअप रिमुव्हरचा वापर करून कापसाच्या बोळ्याने चेहरा स्वच्छ करा. मग कोमट पाण्याने धुवा.

Web Title: Know the disadvantages of pollution for skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.