चेहऱ्याची त्वचा उजळवण्यासाठी 'या' फळं आणि भाज्यांचे ज्यूस करतील मदत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 15:51 IST2018-12-06T15:50:07+5:302018-12-06T15:51:28+5:30
त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी त्वचेची काळजी घेण्यासोबतच आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणंही फायदेशीर ठरतं. फळं आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट असतात.

चेहऱ्याची त्वचा उजळवण्यासाठी 'या' फळं आणि भाज्यांचे ज्यूस करतील मदत!
त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी त्वचेची काळजी घेण्यासोबतच आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणंही फायदेशीर ठरतं. फळं आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. आहारात यांचा समावेश केल्यामुळे त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासोबतच सौंदर्य वाढण्यासही मदत होते. फळं आणि भाज्यांचा ज्यूसही त्वचा उजळवण्यासाठी आणि तजेलदार करण्यासाठी फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया हिवाळ्यातही त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी कोणत्या भाज्यांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे त्याबाबत...
गाजर आणि बीट ज्यूस :
गाजरामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए असंत, तर बीटामध्ये शरीराला आवश्यक पोषक तत्वांसोबतच अॅन्टी-ऑक्सिडंटही मोठ्या प्रमाणावर असतात. गाजर आणि बीटचा ज्यूस प्यायल्याने झिंक, आयर्न, फोलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटक शरीराला मिळतात. हा ज्यूस प्यायल्याने त्वचेचं सौंदर्य वाढण्यास मदत होते.
टॉमेटोचा ज्यूस :
टॉमेटोचा ज्यूस रक्त स्वच्छ करण्यासोबतच त्वचेला पोषण मिळण्यासही फायदेशीर ठरतो. त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी हा ज्यूस उत्तम पर्याय ठरतो.
पालकचा ज्यूस :
पालकच्या भाजीच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी, ई, ए यांसारखे अॅन्टी-ऑक्सिडंट आणि पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. पालकचा ज्यूस प्यायल्याने त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर होण्यास मदत होईल.
काकडीचा ज्यूस :
काकडी हा पाण्याचा उत्तम स्त्रोत मानला जातो. त्यामध्ये 90 टक्के पाणी असतं. हा ज्यूस त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि उजळवण्यासाठी मदत करतो.
सफरचंदाचा ज्यूस :
सफरचंदाच्या ज्यूसमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. दररोज एक सफरचंद खाल्यामुळे आपलं अनेक रोगांपासून बचाव होतो असं आपण नेहमीच ऐकतो. हा ज्यूस त्वचा तजेलदार करण्यासोबतच सौंदर्य वाढविण्यासाठीही फायदेशीर ठरतो.