बदलत्या वातावरणात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. आणि रोजच्या व्यस्त लाईफमध्ये आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. त्वचा काळी पडणे, खाज येणे, पुळ्या येणे. अश्या त्वचेच्या समस्या उद्भवतात. तर काही महिलांना शरीराच्या समस्या सतावतात. 

सर्वसाधारणपणे अनेक महीलांचे अंडरआर्म्स काळे पडतात. आणि मग त्या ठिकाणी पावडर लावण्यापासून, चांगला डीओ लावण्याचे उपाय केले जातात. रोज नीट काळजी न घेतल्याने अंडरआर्म्स काळे पडतात. तसंच त्या भागात सगळ्यांनाच घाम खूप येतो. त्यामुळे तिथली त्वचा काळी पडते. काही मुली काखेतले केस काढण्यासाठी  रेजरचा वापर करतात. निकृष्ट दर्जाच्या रेजरचा वापर केल्यामुळे त्या भागावरील स्कीन काळी पडते. पण अनेक महागडी उत्पादनं वापरून सुध्दा हवातसा फरक दिसून येत नाही. 

तुम्ही सुध्दा वेगवेगळे उपाय करून थकला असाल. तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सची काळजी घेऊ शकता. साबुदाणे हे फक्त उपवासाला चालणारे म्हणून त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून खाल्ले जातात. पण सौंदर्य वाढवण्यासाठी सुध्दा साबुदाणे उपयुक्त ठरतात. चला तर मग जाणून घेऊया  साबुदाण्याचा कसा वापर केल्यास त्वचेसाठी कसे फायदेशीर ठरेल. साबुदाणा हा एक असा खाद्यपदार्थ आहे. ज्यात स्टार्च आणि कार्बोहाइड्रेट योग्य प्रमाणात असतात. महिलांना मोठ्या प्रमाणात ऊर्जेची कमतरता भासते. तेव्हा याची मदत होते.

आरोग्याबरोबरच साबुदाणा हा त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर असतो. साबुदाण्याच्या मास्कने त्वचा उजळते.  साबुदाणा बारीक करून यामध्ये दुध मिसळा. हे मिश्रण लावून  पंधरा मिनिटाने धुवून घ्या. यामुळे अंडरआर्म्सची त्वचा उजळेल. जर काळ्या अंडरआर्म्सपासून मुक्तता मिळवायची असेल तर साबुदाणा बारीक करून यामध्ये हळद आणि दही घाला. त्यातनंतर हे मिश्रण काखेत लावा. अर्ध्या तासांनी धूवून टाका. सलग दोन आठवडे हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल. 

Web Title: How to remove the blackness of underarms by using sago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.