चेहरा चांगला दिसण्यासाठी किंवा  आकर्षक वाटण्यासाठी वेगवेगळे उपाय तुम्हाला माहीत असतात. पण वेळेअभावी सगळे उपाय करणं शक्य होत नसतं.  अशात काही  सोप्या पद्धतीने  तुम्ही आपल्या डोळ्यांची आणि  त्वचेची काळजी घेऊ शकता.  घरगुती वापरात असलेल्या बदामाच्या तेलाचा वापर करून तुम्ही आपला चेहरा चांगला बनवू शकता. 

बदामाच्या तेलात अनेक प्रकारचे मिनरल्स असतात आणि व्हिटॅमीन ए, डी आणि ई अशी विटॅमीन्स यात आहे.   आपण नेहमी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्याला व्हिटामीन डी ची कमतरता जाणवत असते.  बदामाच्या तेलाचा वापर त्वचेवर करून तुम्ही आपल्या त्वचेला चांगलं ठेवू शकता. 

आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी महत्वाचं असतं ते म्हणजे डोळ्यांचं सौंदर्य  पण त्याच डोळ्यांवर जर काळी वर्तुळं आली असतील तर  संपूर्ण लूक खराब होत असतो.  तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी आणि ग्लोसाठी बदाम हे फारच उपयुक्त आहे. हे त्वचेला पोषण देतं, ज्यामुळे त्वचा जास्त मुलायम होते.

बदामाच्या तेलाचा वापर करून तुम्ही डोळ्यांखालची काळी वर्तुळं काढून टाकू शकता. त्यासाठी रात्री झोपण्याआधी डोळ्यांच्या खाली या तेलाने हलकी मालीश केल्यास खूप फायदा होतो. रोज या तेलाचा वापर केल्याने डार्क सर्कल्स निश्चितच कमी होतात. या तेलातील अँटी एजिंग  गुणधर्माचा फायदा सर्वात जास्त आहे. 

या तेलाचा वापर रोज केल्यास त्वचा फ्रेश राहते. यात असलेल्या व्हिटॅमीन आणि फॅटी एसिड्समध्ये एजिंग रिव्हर्स करण्याची आणि त्वचेच्या पेशींना चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. बदाम तेलाचे अनेक लाभदायक फायदे अनेक आहेत. हे तेल सनस्क्रीन म्हणूनही काम करतं. हे त्वचेला टॅनिंग आणि सनबर्नपासूनही वाचवतं. तसंच सूर्याच्या किरणांचा वाईट परिणामही दूर करण्यासाठी बदामाचं तेल फायदेशीर आहे. ( हे पण वाचा-मेकअप रिमुव्हरसाठी खर्च कशाला? घरीच तयार करून मिळवा चमकदार चेहरा)

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर या तेलाने चेहऱ्यावर  मसाज करा. हे तुमच्या स्कीनचा ड्रायनेस घालवतं आणि त्वचेला मुलायम बनवतं.  कोणत्याही  ऋतूत बदामाचं तेल त्वचेसाठी अगदी औषधांप्रमाणे काम करतं. ( हे पण वाचा- केवळ तेल आणि भाज्याचं नाही तर 'या' बीयांमुळेही केस गळण्याची समस्या होईल दूर)

Web Title: How prevent from skin problems and remove dark circles by using almond oil Myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.