त्वचेवर दिसणारे एजिंग स्पॉट्स दूर करण्याचा घरगुती फंडा, एकदा वापरा मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 13:11 IST2019-05-15T13:03:30+5:302019-05-15T13:11:13+5:30
वाढत्या वयासोबतच त्वचेवर अनेक डाग दिसू लागतात. ज्यांचा रंग उजळ असतो त्यांना ही समस्या अधिक होते.

त्वचेवर दिसणारे एजिंग स्पॉट्स दूर करण्याचा घरगुती फंडा, एकदा वापरा मग बघा कमाल!
(Image Credit : Hello Heart)
वाढत्या वयासोबतच त्वचेवर अनेक डाग दिसू लागतात. ज्यांचा रंग गोरा असतो त्यांना ही समस्या अधिक होते. उन्हाळ्यात भर उन्हात बाहेर जावं लागतं, तेव्हा हे डाग अधिकच दिसू लागतात. अनेकजण हे डाग फाउंडेशनच्या मदतीने लपवण्याचा प्रयत्न करतात, फाउंडेशनने ते लपतात देखील, पण दूर होत नाहीत. हे एजिंग स्पॉट वाढण्याआधी दूर करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय केले जाऊ शकतात. याने जरी डाग पूर्णपणे दूर झाले नाही तरी कमी मात्र नक्कीच होतील.
काय आहेत एजिंग स्पॉट?
वय वाढण्यासोबतच त्वचेवर अनेकप्रकारचे डाग येऊ लागतात, ज्यांना एज स्पॉट्स असे म्हणतात. सामान्यपणे हे डाग चेहरा, हात आणि मानेवर येतात. अनेकांना वाटतं की, हे 'एज स्पॉट्स' वाढत्या वयामुळे येतात.
हे आहे कारण?
चेहऱ्यावर येणाऱ्या डागांचं कारण सूर्याची अल्ट्राव्हायलेट किरणे असतात. याच कारणाने जे लोक जास्त उन्हात राहतात, त्यांच्यावर एज स्पॉट्स कमी वयातच अधिक बघायला मिळतात. तसेच असे डाग गोऱ्या रंगाच्या त्वचेवर अधिक लवकर दिसून येतात. त्यामुळे सौंदर्याला गालबोट लागतं. चला जाणून घेऊ हे एज स्पॉट्स दूर करण्याच्या काही टिप्स.
फेस मास्क तयार करण्यासाठी साहित्य
२ चमचे ओटमील
१ चमचा योगर्ट
१ चमचा लिंबाचा रस
१ चमचा हळद
कसा कराल तयार?
- ओटमील ब्लेंडरमध्ये चांगल्याप्रकारे बारीक करून पावडर तयार करा. आता एका वाटीमध्ये १ चमचा योगर्ट घ्या आणि १ चमचा ओटमील पावडर टाका. यात लिंबाचा रस आणि हळद पावडर टाका. या सर्व वस्तूंना चांगलं एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा.
(Image Credit : YoYo Beauty)
कसा कराल वापर?
1) हा फेसपॅक लावण्याआधी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
२) जिथे एज स्पॉट्स आहेत, तिथे ही पेस्ट लावा.
३) त्यानंतर हलक्या हाताने पेस्ट डागांवर ५ मिनिटांसाठी स्क्रब करा.
४) नंतर ही पेस्ट ३० मिनिटांसाठी चेहऱ्यावर तशीच राहू द्या आणि नंतर चेहरा धुवावा.
५) त्यानंतर चेहऱ्या मॉइश्चरायजर लावा.
६) या फेस मास्कचा वापर तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.
७) हा फेस मास्क तयार करण्यासाठी हळदीचा अधिक वापर करू नका.
८) जर त्वचा ड्राय असेल तर लिंबाच्या रसाऐवजी मधाचा वापर करावा. लिंबाच्या रसाने त्वचा आणखी ड्राय होईल.
(टिप : वरील सर्व उपाय केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)