कोणत्याही महागड्या प्रॉडक्टने नाही तर 'या' घरगुती उपायांनी रात्रीतून दूर करा पिंपल्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 13:22 IST2019-06-06T13:20:08+5:302019-06-06T13:22:06+5:30
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. पण एक पिंपल तुमच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरू शकतो.

कोणत्याही महागड्या प्रॉडक्टने नाही तर 'या' घरगुती उपायांनी रात्रीतून दूर करा पिंपल्स!
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. पण एक पिंपल तुमच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरू शकतो. केवळ एका पिंपलने तुमची झोप उडू शकते आणि तुम्ही सतत याचा विचार करत असता की, यापासून सुटका कशी मिळवायची. अशात तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, पिंपल्सपासून सुटका मिळवण्याचे उपाय तुमच्या किचनमध्येच आहेत. पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्ही महागडी ब्यूटी प्रॉडक्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी हे काही घरगुती उपाय करून बघा.
बर्फ
(Image Credit : YouTube)
पिंपल्स दूर करण्यासाठी बर्फाने मदत होऊ शकते. बर्फाचा एक तुकडा कपड्यामध्ये गुंडाळून पिंपलवर १ मिनिटासाठी ठेवा. असं दोन-तीन वेळा करा, याने पिंपल्स दूर होतील.
लिंबू
लिंबात सिट्रिक अॅसिड असतं. तसेच लिंबामध्ये असेही आणखी काही पदार्थ असतात जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. लिंबू एक चांगलं अॅंटी-ऑक्सिडेंट आहे. पिंपल्स दूर करण्यासाठी कॉटन लिंबाच्या रसात बुडवून पिंपलवर लावा आणि रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी पाण्याने चेहरा धुवा.
अॅलोव्हेरा
त्वचेला अॅलोव्हेराचे काय काय फायदे होतात हे सर्वांनाच माहीत आहे. अॅलोव्हेरा तुमच्या त्वचेचा डॉक्टर आहे. याने सनबर्नसोबतच पिंपल्सपासूनही सुटका मिळते.
मध
थोडं मध पिंपलवर लावा. याचे त्वचेला अनेक फायदे होतात. चेहऱ्यावर ग्लो मिळवण्यासाठी तुम्ही चेहऱ्यार मधाचा फेस मास्कही लावू शकता. हा मास्क चेहऱ्यावर ५ मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. याने पिंपल्स तर दूर होतीलच, सोबतच चेहरा उजळेल सुद्धा.
काकडी
काकडी ही कोणत्याही प्रकारची सूज दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच पिंपल्स आणि चेहऱ्यावरील डागही याने दूर होतात. काकडीने चेहऱ्याला गारवा मिळतो आणि याने त्वचा हायड्रेट राहते.