अनेकजण ब्लॅक हेड्सच्या समस्येने त्रस्त असतात. पण तुम्हाला माहीत आहे का?  ब्लॅक हेड्सप्रमाणे व्हाइट हेड्सही असतात. चेहऱ्यावरील त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये तयार होतात. चेहरा आणि नाकावर येणारे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स लूक बिघडवण्याचं काम करतात. हे रिमूव्ह करण्यासाठी मुली ट्रिटमेंट घेतात. या ट्रिटमेंट वेदनादायी असण्यासोबतच खर्चिकही असतात. 

अशातच घरगुती उपाय करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. ज्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स दूर होण्यासोबतच वेदनाही होत नाहीत आणि खर्चही वाचतो. 

साहित्य : 

  • साखर अर्धा चमचा 
  • तांदळाचं पीठ अर्धा चमचा 
  • मध अर्धा चमचा 
  • लिंबाचा रस अर्धा चमचा 

 

तयार करण्याची पद्धत : 

सर्वात आधी साखर जाडसर वाटून घ्या. त्यानंतर बाउलमध्ये सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या. लक्षात ठेवा की, पेस्ट घट्ट असावी. 

वापरण्याची पद्धत :
 
स्टेप 1 : सर्वात आधी चेहरा फेसवॉशच्या मदतीने स्वच्छ करा 

स्टेप 2: यानंतर पाणी गरम करा. त्यामध्ये टॉवेल बुडवून नाक आणि ब्लॅकहेड्स किंवा व्हाइट हेड्स असलेल्या त्वचेवर वाफ द्या. यामुळे पोर्स ओपन होतात. ज्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स अगदी सहज निघून जातात. असं कमीत कमी दोन मिनिटांसाठी करा. 

स्टेप 3 : त्यानंतर तयार फेसपॅक ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सवर लावा आणि 10 ते 15 मिनिटांसाठी तसचं ठेवा. 

स्टेप 4 : आता लिंबाची साल किंवा सॉफ्ट टूथब्रशच्या मदतीने मसाज करा. हलक्या हातांनी मसाज करा. अन्यथा त्वचेवर रॅशेज पडू शकतात. असं कमीत कमी 2 मिनिटांसाठी करा आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ करा. 

स्टेप 5 : त्यानंतर चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. आता थंड पाण्यामध्ये टॉवेल भिजवून नाकावरचे पोर्स बंद करा. 

लक्षात ठेवा ही गोष्ट : 

आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा या पॅकचा वापर करा. तसेच पॅक लावण्याआधी हातावर लावून टेस्ट घ्या. जर एखादा पदार्थ तुम्हाला सूट होत नसेल तर त्याचा वापर करू नका. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.) 

Web Title: Home remedies to get rid of blackheads and whiteheads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.