केसगळतीवर हा होऊ शकतो रामबाण उपाय, टक्कल पडण्याचं टेन्शन होणार दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 14:06 IST2018-05-19T14:06:27+5:302018-05-19T14:06:27+5:30
अनेकांना आपल्याला टक्कल पडेल या सावटाखाली रहावं लागतं. पण ही भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला आम्ही असा काही उपाय सांगणार आहे त्याने तुमची केस गळती थांबेल.

केसगळतीवर हा होऊ शकतो रामबाण उपाय, टक्कल पडण्याचं टेन्शन होणार दूर
(Image Credit: Indian Makeup and Beauty Blog)
मुंबई : अलिकडे केस गळती ही समस्या फारच गंभीर बनत चालली आहे. वेगवेगळ्या कारणांनी केस गळतीची समस्या अनेकांना भेडसावते. पण यावर उपायही करता येतात. अनेकांना आपल्याला टक्कल पडेल या सावटाखाली रहावं लागतं. पण ही भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला आम्ही असा काही उपाय सांगणार आहे त्याने तुमची केस गळती थांबेल.
केसांना नैसर्गिक रंग देण्याच्या प्रक्रियेत ‘हीना‘ प्रामुख्याने वापरला जातो. त्यासोबतच मूळापासून केस घट्ट करण्याची क्षमता हीनात आहे. हीनामुळे केस घनदाट, मऊ व सुंदर बनतात व केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. हीनाच्या वापरामुळे टाळू व केसांची योग्य काळजी घेण्यास मदत होते. त्याच्या आवरणामुळे केस तुटण्यापासून बचावतात आणि हीनामुळे केस दाट व घट्ट होतात.
हीना हेअर पॅक्स
1) हीना व राईचं तेल
२५० ग्रॅम राईच्या तेलात ६० ग्रॅम धूतलेली हिनाची पाने टाका. हे मिश्रण उकळून नंतर गाळून घ्या. आवश्यक तेवढ्या तेलाने टाळूवर मसाज करा व उर्वरित हवाबंद डब्यात ठेवा. असे रोज केल्यावर केसगळतीची समस्या आटोक्यात येण्यास मदत होइल.
2) हीना व दही
हीना केसांची मूळ घट्ट करतात तर दही केसांना पोषण देतात.एक कप सुकी हिना पावडर अर्धा कप दह्यात मिसळून तासभर केसांना लावून ठेवा तासाभराने केस धुऊन टाका.
3) हीना व आवळा , मेथी दाणे
या मिश्रणामुळे केसांनी गमावलेले प्रोटीन परत मिळवण्यास मदत होते. टाळूवर आवळ्याच्या वापारामुळे केसांची मूळ घट्ट होतात. मेथीतील प्रोटीन , व्हिटामिन सी व लोह केसांची वाढ वाढवतात. यासाठी एक कप आवळा, तीन टेबलस्पून हीना पावडर , दोन टेबलस्पून मेथी दाणे, एका अंड्यातील पांढरा भाग व लिंबाचा अर्क एकत्र करा. हे मिश्रण लावण्यापूर्वी तासभर आधी बनवून ठेवा. हा हेअर पॅक लावल्यानंतर ४५ मिनिटांनी काढून टाका.