वेळेआधीच म्हातारे दिसताय असं वाटतंय का? मग या लक्षणांनी ओळखा अन् म्हातारपणाच्या खुणा टाळा

By manali.bagul | Published: January 29, 2021 06:24 PM2021-01-29T18:24:01+5:302021-01-29T18:31:57+5:30

Beauty Tips in Marat5hi : ५ मिनिटांपासून ३० मिनिटांपर्यंत चालून तुम्ही आरोग्याची काळजी घेऊ शकता. 

Health is your body aging faster than it should be | वेळेआधीच म्हातारे दिसताय असं वाटतंय का? मग या लक्षणांनी ओळखा अन् म्हातारपणाच्या खुणा टाळा

वेळेआधीच म्हातारे दिसताय असं वाटतंय का? मग या लक्षणांनी ओळखा अन् म्हातारपणाच्या खुणा टाळा

Next

वाढत्या वयात शरीरावर म्हातारपणाच्या खुणा दिसणं  साहाजिक आहे. पण अनेकदा कमी वयातच  लोक म्हातारं झाल्याप्रमाणे दिसू लागतात. या सगळ्यात तुम्ही आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. धकाधकीच्या आयुष्यात अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. आज आम्ही तुम्हाला अशी लक्षणं सांगणार आहोत. ज्या लक्षणांवरून तुम्हाला म्हातारपणाच्या खुणा ओळखता येतील. जर तुमचं वय ४० असेल तर तुम्ही हळूहळू म्हातारपणाकडे वळत आहात. अशावेळी म्हातारपणाची लक्षणं दिसू शकतात त्यासाठी  तुम्ही  चालण्याचा व्यायाम करायलाच हवा. ५ मिनिटांपासून ३० मिनिटांपर्यंत चालून तुम्ही आरोग्याची काळजी घेऊ शकता. 

त्वचेतील बदल

 ५० वर्षानंतर चेहरा, त्वचा आणि हातांवर पांढरे डाग दिसायला सुरूवात होते.  असे स्पॉट्स जास्त दिसत असतील तर दुर्लक्ष न करता लवकरता लवकर तज्ज्ञांशी संपर्क करायला हवा. मान, कपाळ, डोळ्यांच्या खाली सुरकुत्या दिसू लागतात

स्मरणशक्ती कमकुवत होणं

 वाढत्या वयात स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते.  ६५ वयानंतर अनेकांना डिमेंशन, अल्जायमरची समस्या उद्भवते.  संतुलित आहार, व्यायाम  दररोज करून तुम्ही अशी स्थिती टाळू शकता. आता टक्कल पडल्याची चिंता सोडा, 'या' औषधाने पुन्हा डोक्यावर येतील केस असा वैज्ञानिकांचा दावा

सांधेदुखीच्या वेदना

म्हातारपणात अनेकांना ऑस्टिओआर्थरायटीसची समस्या उद्भवते. साधारणपणे ४५ ते ५५ या वयात अशी स्थिती उद्भवते.  रोज व्यायाम करून तुम्ही  ही स्थिती टाळू शकता. शिड्या उतरायला चढायला  त्रास होणं म्हातारपणाचं लक्षण असू शकतं.

डोळ्यांवर परिणाम

जसजसं वय वाढत जातं तसं नजरेवर परिणाम होतो. त्यामुळे ग्लूकोमा, नाईट ब्लाइंडनेस  त्रास वाढू शकतो. या समस्येपासून बचाव करण्यासाठी स्मोकिंग करणं सोडा, चांगला आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. केस गळतीसह वेळेआधी पडलेलं टक्कल घालवण्यासाठी फायदेशीर ठरेल हा मास्क; जाणून घ्या फायदे

वयवाढीच्या खुणा नको असतील तर टाळा हे पदार्थ

१- अनेकदा आपण हेल्थ ड्रिंकचा वापर करतो. पण हे हेल्थ ड्रिंक्स आपल्या अपेक्षेपेक्षाही खूपच वेगानं म्हणजे अगदी दुपटीनं आपल्याला ‘म्हातारं’ करतात. त्यात असलेली साखर आपल्या दातावर आणि आपल्या त्वचेवरही विपरित परिणाम करते.

२- बेकरी प्रॉडक्ट्स आपल्याला कितीही आवडत असले तरीही तुमच्या तोंडावरच्या सुरकुत्या ते वाढवील. या पदार्थांतली साखर आणि फॅट्स यामुळे तुमचं वजनही वाढेल आणि दातांचही आरोग्य बिघडवेल.

३- साखर, साखरेचे पदार्थ तर आपल्या संपूर्ण शरीरासाठीच घातक आहेत. गरजेपेक्षा जास्त साखर आपल्या शरीरात जाणं म्हणजे स्वत:हून म्हातारपणाला निमंत्रण देणं. साखर आपल्या त्वचेचीही वाट लावते आणि आपोआपच म्हातारपणाकडे तुमची वाटचाल सुरू होते.

४- ओट्स, पास्ता यासारखे पदार्थ हळूहळू तुम्हाला वृद्धत्वाकडे घेऊन जातात. तुमची त्वचा तर निस्तेज होतेच, पण वयवाढीची प्रक्रियाही त्यामुळे गतिमान होते.

५- अल्कोहोल, म्हणजे दारूचं व्यसन जर तुम्हाला असेल तर मग संपलंच. क्वचित कधी तरी अधूनमधून काही घोट तुम्ही घेत असाल, तर ठीक आहे, पण त्याचं प्रमाण जर वाढलं, तर तुमच्या अकाली म्हातारपणाला कोणीही पकडून ठेऊ शकणार नाही.

६- ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात मीठ आहे असे पदार्थही आवर्जून टाळायला हवेत.

७- प्रोसेस्ड फूडशिवाय आज आपल्या स्वयंपाकघरातलं पान हलत नाही. पण असे पदार्थ शक्यतो टाळायलाच हवेत.

८- कॉफी अनेकांना आवडते. चहाला पर्याय म्हणूनही अनेक जण कॉफी पितात, पण त्याचं प्रमाण जर वाढलं, तर रोजचा दिवस तुम्हाला जास्त वेगानं वार्धक्याकडे ढकलतोय, हे लक्षात ठेवा.

(टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Health is your body aging faster than it should be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.