आता टक्कल पडल्याची चिंता सोडा, 'या' औषधाने पुन्हा डोक्यावर येतील केस असा वैज्ञानिकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 01:49 PM2021-01-29T13:49:22+5:302021-01-29T14:06:34+5:30

या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, मॅंग्रोव झाडाच्या अर्काच्या मदतीने टक्कल पडण्याच्या समस्येपासून सुटका मिळवता येऊ शकते.

केसगळतीची समस्या ही जगभरातील लोकांना भेडसावत आहे. त्यामुळे लोक केस परत मिळवण्यासाठी नको नको ते उपाय करतात. यावर वेगवेगळे रिसर्च आणि दावेही समोर येत असतात. आता थायलॅंडचा एका रिसर्चमधून केसगळतीची समस्या नेहमीसाठी दूर होईल असा दावा केला आहे.

या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, मॅंग्रोव झाडाच्या अर्काच्या मदतीने टक्कल पडण्याच्या समस्येपासून सुटका मिळवता येऊ शकते. या अर्काला Avicequinon C असं म्हटलं जातं आणि याने त्या हार्मोन्सना रोखलं जातं जे केसगळतीला जबाबदार असतात.

Chulalongkorn यूनिव्हर्सिटीच्या काही वैज्ञानिकांनी ५० पुरूष आणि महिलांवर हा प्रयोग केला. हे सर्वच लोक एंड्रोजेनिक एलोपिसियाने ग्रस्त होते. ही एक केसगळतीची सामान्य आणि कॉमन समस्या आहे.

या ट्रीटमेंटनंतर या लोकांची केसगळती कमी तर झालीच सोबतच त्यांचे केस आणखी मजबूतही झाले. रिसर्चनुसार, हे त्या लोकांसाठी सुद्धा अधिक फायदेशीर आहे ज्यांनी त्यांचे केस गमावले आहेत.

या रिसर्चशी संबंधित एका प्राध्यापकांनी सांगितले की, आम्ही लोकांच्या डोक्याच्या प्रत्येक भागाचे फोटो घेतले होते. त्यासोबतच हेअर लॉस झालेल्या भागांसाठी मायक्रोस्कोपची मदतही घेतली. ही प्रक्रिया आम्ही चार महिने केली.

त्यानंतर आम्ही या लोकांना टक्कल पडलेल्या भागांची पाहणी केली होती आणि केवळ महिन्यातच केसांच्या मजबूतीत बराच सकारात्मक बदल बघायला मिळाला होता. तसेच कोणत्याही व्यक्तीला यापासून कोणतीही अॅलर्जी झाली नव्हती.

याबाबत सांगताना प्राध्यापक Wanchai Deeknamkul म्हणाले की, मॅंग्रोवचा हा अर्क एविसेनिया मारिन नावाने ओळखला जातो. यात प्रमुख रासायनिक एविसेक्विनन-सी असतं.

आम्हाला आढळलं की, हे बरंच फायदेशीर आहे. सर्वातआधी तर हे त्या एंजायम्सना रोखतं जे केसगळतीचे हार्मोन्स तयार करतं. तसेच याने असे प्रोटीन निर्माण होतात ज्यामुळे केसांची वाढ आणि मजबूती चांगली होते.

या रिसर्चचा पुढील टप्पा जास्तीत जास्त लोकांवर ही टेस्ट करणं हा आहे. थायलॅंड फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने याला मान्यता द्यावी. एका प्रायव्हेट कंपनीने आधीच या रिसर्चचे पेटंट खरेदी केले आहेत.

ही कंपनी याद्वारे हेअर लॉस प्रॉडक्टची निर्मिती करेल. मानलं जात आहे की, पुढील सहा महिन्यात हे प्रॉडक्ट बाजारात येऊ शकतं.

Read in English