वाढत्या वयातसुद्धा नेहमी तरूण दिसण्यासाठी वापरा 'हा' सोपा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 05:30 PM2020-03-25T17:30:45+5:302020-03-25T17:35:03+5:30

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या सर्वाधीक जाणवते. तसंच वयाआधीच बरेच लोक वयस्कर असल्यासारखे दिसतात.

Health tips to slow down aging speed by three day fasting myb | वाढत्या वयातसुद्धा नेहमी तरूण दिसण्यासाठी वापरा 'हा' सोपा फंडा

वाढत्या वयातसुद्धा नेहमी तरूण दिसण्यासाठी वापरा 'हा' सोपा फंडा

Next

सध्या कोरोना व्हायरसमुळे  होत असलेल्या मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेता भारतात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. घरी बसल्यामुळे अनेकांचं वजन वाढायला सुरूवात झाली आहे. आधीच जीवनशैलीतील बदलांमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या सर्वाधिक जाणवते. तसंच वयाआधीच बरेच लोक वयस्कर असल्यासारखे दिसतात.आज आम्ही तुम्हाला काही खास उपाय  सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही आपलं वजन नियंत्रणात ठेवू शकता. 

 WBC काऊंट म्हणजेच शरीरातील आणि डॅमेज पेशी कमी होण्यासाठी २४ ते ४८ तासांचा कालावधी लागत असतो. म्हणूनच तुम्ही फास्टींग करणं गरजेचं आहे.  शरीरात एर्नेजेटिक सेल्स निर्माण करण्यासाठी आणि रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  तीन दिवस उपवास करणं  गरजेचं आहे. 

यूनिवर्सिटी ऑफ कॅलिफॉर्निया यांच्या अभ्यासानुसार लागोपाठ तीन दिवस फास्टिंगमुळे रोगप्रतिकराकशक्ती वाढण्यास मदत होते.  कारण उपवास केल्याने शरीरातील एनर्जी वाचवण्यासाठी फायदेशीर ठरतं.  याबदलांमुळे शरीरातील इम्युन सेल्स  रिसायकल होत असतात.  त्यामुळे डॅमेज झालेल्या पेशी निघून जाण्यास मदत होते. जास्तवेळ उपाशी राहिल्याने आपल्या शरीरातील संरक्षित ग्लुकोजचा वापर होत असतो.  त्यामुळे शरीरात जमा झालेलं फॅट निघून जाण्यास मदत होते. त्वचा दीर्घकाळ चांगली राहण्यासाठी  हे फायदेशीर ठरत असतं. 

किटोन शरीरातील  एंटीऑक्सिटडेशन वाढवतात. त्यामुळे शरीरात सतत चालू असलेले ऑक्सीडेशन आणि प्रक्रियेला शांत करतात.  म्हणून वयाआधीच आपण म्हातारं दिसायला लागतो. त्यासाठी आठवड्यातून  एकदातरी उपवास करणं गरजेचं आहे.  या प्रकाराला थ्रीडे्ज फास्टींग असं सुद्धा म्हणतात. ( हे पण वाचा-Corona virus : सतत साबणाच्या वापराने कोरड्या झालेल्या हातांना 'असं' बनवा घरच्याघरी सॉफ्ट)

जे लोक डायबीटीस, बीपी, अस्थमा अशा आजारांनी त्रस्त आहेत अशा लोकांनी अशा प्रकारचं फास्टिंग करता कामा नये. ज्या लोकांची मेडीकल ट्रिटमेंट चालू आहे अशा लोकांनी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला  घेणं गरजेचं आहे. जे लोक कोणत्याही औषधांचे सेवन करत असतील तर डॉक्टरांच्या सल्लानेच  हे फास्टिंग करायला हवं.

( हे पण वाचा-चमकदार आणि दाट केसांसाठी स्पा, मसाजपेक्षा जास्त इफेक्टीव्ह ठरेल दह्याचा वापर)

Web Title: Health tips to slow down aging speed by three day fasting myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.