चमकदार आणि दाट केसांसाठी स्पा, मसाजपेक्षा जास्त इफेक्टीव्ह ठरेल दह्याचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:20 PM2020-03-25T12:20:08+5:302020-03-25T12:45:52+5:30

केस गळण्याची समस्या या महिलांसह पुरूषांना सुद्धा जाणवत असतात. महागड्या क्रिम्समधून केमिकल्सचा वापर केल्यामुळे केस खराब होत असतात. अनेक उपाय करून सुद्धा हवे तसे चमकदार आणि दाट केस आपल्याला मिळत नाही. प्रदुषणाच्या वाढत्या परिणामांमुळे ही अधिकाधिक वाढत जाते.

आपल्याला अनेकदा घरगुती उपाय करायचा कंटाळा आलेला असतो . त्यामुळे आपल्याला वेळ द्यावा लागत असतो. आज आम्ही तुम्हाला सुट्टीचा फायदा घेत तुम्ही कशापध्दतीने केसांची काळजी घेऊ शकता याबाबत सांगणार आहोत.

दह्याचा आपण आहारात समावेश करतो . त्यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळत असतात. केसांसाठी सुद्धा तुम्ही दह्याचा वापर करू शकता. आयर्न, विटामिन ए, विटामिन बी 1, विटामिन बी 2, विटामिन बी 5 आणि विटामिन सी सारख्या अनेक खनिज तत्त्वांची भर असते.

विटामिन्स तुमच्या शरीर निरोगी राहण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. दही केसांना लावल्यास, केस थंड राहतात आणि केसांमध्ये ओलावा राहतो अर्थात केसांना दही चांगलं मॉईस्चराईज करतं.

तुमचे केस जर गळत असतील तर दह्यामध्ये काही कडिपत्त्याची पानं घाला. ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांवर लावल्यास, तुमची केसगळती तर थांबेलच. पण तुमचे केस काळेदेखील होतील.

लिंबू आणि दह्याचे मिश्रण हे केसांसाठी अतिशय लाभदायक असतं. त्यासाठी एका भांड्यात दही, दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा मध घ्या. त्यानंतर हे मिश्रण 20 मिनिटांपर्यंत केसांना लाऊन ठेवा. मग कोमट पाण्याने केस धुवा. आठवड्यातून एकदाच हे मिश्रण केसांना लावावं.

एलोवेरा आणि दही यांचं मिश्रण केसांवर 15 मिनिटं लाऊन केसांना मालिश करा. अर्धा तासात हे मिश्रण सुकेल आणि मग केस शँपू लाऊन धुऊन टाका. केसांच्या वाढीसाठी आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा.

केस खूपच कोरडे आणि निस्तेज झाले असतील तर दही, अंडी आणि बदामाच्या तेलाचं मिश्रण नक्की यावर उपयुक्त आहे. या तीन वस्तू मिसळून केसांना लावल्यास, तुमचे केस मऊ आणि मजबूत होतील. अर्धा तास हे मिश्रण लाऊन शँपूने केस धुऊन घ्या. यामुळे कोंड्याच्या समस्येपासून सुद्धा तुम्हाला आराम मिळेल

केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी आणि केसांची चमक वाढवण्यासाठी दह्यामध्ये बेसन घालून केसांना मुळापासून लावा आणि एक तासाने धुऊन टाका.

दह्यामध्ये काळ्या मिरीची पावडर घालून लावल्यास, कोंड्याची समस्या दूर होते आणि केस साफ, मुलायम, काळे आणि घनदाट होतात.