बॉलिवूडमधील टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक असलेल्या काजोलचा आज वाढदिवस. पडद्यावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असणारी आणि चुलबुली असलेल्या काजोलची स्किन नेहमी ग्लो करत असते. आपली ग्लोइंग आणि सॉफ्ट स्किन मेन्टेन ठेवण्यासाठी ही अनेक गोष्टींची काळजी घेते. जर तुम्हालाही काजोलसारखी फ्लॉलेस स्किन पाहिजे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी तिचे काही खास ब्युटी सीक्रेट्स सांगणार आहोत. 

यंग एजपासूनच घ्या स्किनची काळजी

वाढत्या वयानुसार, त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच त्वचेशी निगडीत कोणत्याही समस्या दूर होण्यासाठीही वेळ लागतो. कारण वाडत्या वयानुसार, नवीन स्किन सेल्स तयार होणं बंद होतं. त्यामुळे यंग एजपासूनच त्वचेची काळजी घेणं फायदेशीर ठरतं. काजोलने दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये असं सांगण्यात आलं की, ती आधी आपल्या त्वचेची अजिबात काळजी घेत नसे. परंतु जसं वय वाढू लागलं तसं तिला समजलं की, आपल्याला त्वचेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. 

त्वचा ठेवा स्वच्छ 

स्किन स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी सीटीएम मेथज बेस्ट ठरते. या मेथडनुसार, क्लिन्जिंग, टोनिंग आणि मॉयश्चरायझिंग अशा स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. यामुळे चेहरा फक्त क्लिन राहत नाही तर अनेक स्किन प्रॉब्लेम्स दूर होतात. काजोल दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ करते. त्यामुळे तिचे स्किन पोर्स स्वच्छ होण्यास मदत होते. 

मेकअप स्वच्छ करायला विसरत नाही

काजोल कधीही मेकअप क्लीन करायला विसरत नाही. ती इव्हेंटवरून परत आल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मेकअप क्लीन करायला विसरत नाही. कारण मेकअप वेळीच स्वच्छ केला नाही तर त्यामुळे स्किनच्या अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता आणखी वाढते. 

बॉडी हायड्रेशन

बॉडीला टॉक्सिन फ्री ठेवण्यासाठी आणि चेहऱ्याचा ग्लो वाढविण्यासाठी दिवसभरात कमीत कमी 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. 

सनस्क्रीन

सनस्क्रिन फक्त यूव्ही रेज नाहीतर वातावरणातील त्वचेसाठी हानिकारक असलेल्या अनेक गोष्टी त्वचेपासून दूर ठेवते. काजोल कधीही सनस्क्रिन लावणं विसरत नाही आणि जर तुम्हाला त्वचेचं तारूण्य जपायचं असेल तर हे लावणं अजिबात विसरू नका. 

फेशिअल 

बिजी शेड्यूल असतानाही काजोल फेशिअल नक्की करते. महिन्यामध्ये ती एकदातरी पार्लरमध्ये नक्की जाते. 

एक्सरसाइज 

काजोल एक्सरसाइजची आपल्या डेली रूटिनमध्ये समावेश करते. हेव्ही वर्कआउटऐवजी डान्स आणि कार्डिओ अ‍ॅक्टिव्हीटीला महत्त्व देते. ज्यामुळे फक्त तिची बॉडी हेल्दी राहते. तसेच तिला स्ट्रेस कमी करण्यासाठीही मदत मिळते. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Happy Birthday Kajol skin care beauty secrets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.