'या' चुकांमुळे शेविंगनंतर त्वचेवर बारीक दाणे येतात, हॅण्डसम लूकसाठी वापरा 'हा' खास फंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 16:08 IST2020-05-12T16:01:52+5:302020-05-12T16:08:40+5:30
शेविंग करताना कोणती काळजी घ्यायची याबाबत सांगणार आहोत.

'या' चुकांमुळे शेविंगनंतर त्वचेवर बारीक दाणे येतात, हॅण्डसम लूकसाठी वापरा 'हा' खास फंडा
सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र पार्लर आणि सलून बंद असल्यामुळे पुरूषांना कधी एकदा लॉकडाऊन संपतोय असं झालंय. कारण अनेकांना आठवड्यातून एकदा तरी सलून मध्ये जाण्याची सवय असते. पण आता अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद असल्यामुळे लोकांना घरच्याघरीच आपली काम आटपावी लागत आहेत.
सलूनमध्ये दाढी केल्यानंतर मसाज आणि दाढी करण्याची क्रिया योग्य रितीने होत असल्यामुळे जळजळण्याचा त्रास होत नाही. पण अनेकदा घरी शेविंग केल्यानंतर अनेकदा केसांची वाढ व्यवस्थित होत नाही. त्वचेचा सूज येते. त्वचा लाल होते. काहीवेळा पिंपल्स येतात. अशा समस्या उद्भवतात. आज आम्ही तुम्हाला शेविंग करताना कोणती काळजी घ्यायची याबाबत सांगणार आहोत.
अनेकजण वारंवार एकाच ब्लेडचा वापर करतात. त्यामुळे त्वचा खराब होते. ब्लेडला धार असेल तर वापरायला वारंवार वापरायला हरकत नाही असं अनेकांना वाटतं. पण असं नसून चार ते पाच वेळा शेविंग केल्यानंतर ब्लेड बदलायला हवेत. अन्यथा त्वचेचं नुकसान होऊ शकतं. अनेकदा जुन्या ब्लेडचा वापर केल्यामुळे त्वचा कापली जाण्याची शक्यता असते. जुन्या गंज लागलेल्या ब्लेडच्या वापरामुळे त्वचेवर रक्त येणं, पू तयार होणं असा त्रास होऊ शकतो.( घामोळ्यांनी हैराण असाल तर; 'या' घरगुती उपायांनी खाज, पुळ्यांसह जळजळ होईल दूर)
योग्य शेविंग क्रिमचा वापर करा. आजकाल त्वचेनुसार क्रिम उपलब्ध असतात. शेविंग क्रिमचा वापर केल्यामुळे जर त्वचेवर दाणे येत असतील तर शेविंग फोमचा वापर करा. क्लिन शेव ठेवण्यासाठी रोज शेविंग करणं गरजेच नसतं. त्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. तुमच्या दाढीचे केस पूर्ण वाढू द्या. मगच शेविंग करा.
शेविंग करत असतान हलक्या हाताने रेजर फिरवा. रेजर फिरवत असताना ताकद लावण्याची काहीही गरज नसते. कारण ब्लेडला धार असल्यामुळे रेजर हलक्या हाताने फिरवलं तरी काम होते. जोरात रेजर फिरवल्यामुळे खाज येण्याची शक्यता असते. शेविंग करत असताना थंंड पाण्याचा वापर करू नका. कारण त्यामुळे त्वचा कडक होते. आणि शेविंग करण्यासाठी अडचडींचा सामना करावा लागतो. शक्यतो कोमट पाण्याचा वापर करा.(लॉकडाऊनमध्ये दाट केस मिळवा; केस गळणं थांबवण्यासाठी घरच्याघरी वापरा 'हे' खास फंडे)