उन्हाळ्यात शरीराला घाम खूप येतो तसा केसांमध्ये सुद्धा घाम येतो. केसांना जास्त घाम आल्यामुळे स्काल्पवर पुळकुट्या त्यामुळे खाज येण्याची समस्या उद्भवते. वातावरणात होत असलेले बदल, प्रदुषण यांमुळे केसांशी निगडीत अनेक समस्या जाणवतात. केस गळणं, केसांना खाज येणं तसंच कोंडा होणं अशा अनेक समस्यांचा सामना आपल्याला रोजच्या जीवनात करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला केस गळण्याच्या समस्येवर उपाय सांगणार आहोत. सध्या लॉकडाऊनमुळे घरी खूपच वेळ असतो. त्यामुळे घरगुती उपयांचा वापर करून तुम्ही गळणारे केस थांबवू शकता. 

मध

मधाचा वापर करण्यासाठी तुम्हाला  वेगळी मेहनत घ्यायची गरज नाही. मध आणि शॅम्पू एकत्र करून घ्या आणि तुमचे केस नेहमीप्रमाणे धुवा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग केला. तुमचे केस बळकट आणि मजबूत होण्यासाठी मध हा चांगला पर्याय आहे. तुमच्या केसांना पोषक तत्व मधामुळे मिळतात. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या केसांना हानी पोहचवण्यापासून संरक्षण देतात.

हळद

हळद पावडर, एक कप कच्चं दूध, २ चमचे मध दुधामध्ये हळद आणि मध मिक्स करून घ्या. हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांना लावा. अर्धा तास तसंच ठेवून केस तसंच ठेवून शँपू आणि कोमट पाण्याने केस धुवा, आठवड्यातून एक वा दोन वेळा हा प्रयोग करा. हळद ही आजारांवरही लाभदायक असते. त्याचप्रमाणे केसांसाठीदेखील गुणाकारी आहे. यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे तुमच्या केसांची त्वचा चांगली राहते आणि यामधील अँटीऑक्सिडंट, अँटीसेप्टीक आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणांमुळे केसांची वाढ चांगली होते. (हे पण वाचा-घामोळ्यांनी हैराण असाल तर; 'या' घरगुती उपायांनी खाज, पुळ्यांसह जळजळ होईल दूर)

कांदा

सगळ्यात आधी कापलेल्या कांद्याचा मिक्सरमधून ज्युस काढून घ्या. अतिशय काळजीपूर्वक कांद्याचा रस तुमच्या केसांना मुळापासून लावा तेही कापसाच्या सहाय्याने. अजिबात केसांवर रस थापू नका आणि साधारण २० मिनिटं लावून ठेऊन द्या. शँपूने त्यानंतर केस धुवा.   आठवड्यातून एक वेळ तुम्ही हा प्रयोग करू शकता. कांद्याच्या रसामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांच्या वाढीला वेग येतो. केस वाढवण्यासाठी हा सर्वात जुना आणि अगदी योग्य उपाय आहे. (हे पण वाचा-कोरोनाशी लढण्यासाठी कॅन्सर आणि रक्तदाबाची औषधं ठरत आहेत प्रभावी; जाणून घ्या कशी)

Web Title: Home remedies for hair loss problems in lockdown myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.