कोरोनाशी लढण्यासाठी कॅन्सर आणि रक्तदाबाची औषधं ठरत आहेत प्रभावी; जाणून घ्या कशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 04:14 PM2020-05-09T16:14:35+5:302020-05-09T16:34:05+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या औषधाबाबत संशोधन पूर्ण होत नाही तोपर्यंत रुग्णाचा जीव वाचवण्याासाठी कॅन्सर, बीपी आणि मानसिक आजारांवरच्या औषधांचा वापर केला जात आहे.

CoronaVirus News Marathi: Research scientists test drugs cancer depression high bp treat coronavirus myb | कोरोनाशी लढण्यासाठी कॅन्सर आणि रक्तदाबाची औषधं ठरत आहेत प्रभावी; जाणून घ्या कशी

कोरोनाशी लढण्यासाठी कॅन्सर आणि रक्तदाबाची औषधं ठरत आहेत प्रभावी; जाणून घ्या कशी

googlenewsNext

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.  कोरोना व्हायरसच्या माहामारीतून लोकांना वाचवण्यासाठी शास्त्रज्ञांकडून लस किंवा औषध शोधण्याचे प्रयत्न केले जात आहे. तर भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं असून लोकांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्याच्या सुचना दिल्या जात आहेत.

कोरोना रुग्णांची प्रकृती बरी करण्यासाठी डॉक्टर प्रत्येक  गंभीर आजारात वापरल्या जात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांवर करत आहेत. त्यात कॅन्सर, रक्तदाब अशा आजारांवरील औषधं ,गोळ्यांचा समावेश आहे. तज्ञांच्या मते या औषधांचा प्रयोग केल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. या औषधांमुळे कोरोना व्हायरसला फुफ्फुसांपर्यंत पसरण्यापासून रोखता येऊ शकतं. 

कॅन्सरचे औषध रक्सोलिटिनिब यावर सध्या  क्लिनिकल टेस्ट सुरू आहे. हे औषधं बोनमॅरो कॅन्सरवर वापरलं जातं. रक्सोलिटिनिबवर वॉशिंगटन यूनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये चाचणी सुरू आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधांमुळे शरीराला सुज येत नाही. याशिवाय रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. 

फ्लूवॉक्सामाइन या मानसिक विकारांसाठी वापरात असलेल्या औषधांमुळे मेंदूत सेरेटोनिन नावाच्या न्यूरोट्रांसमीटरचं संतूलन व्यवस्थित राहतं. त्यामुळे मनस्थिती सुद्धा चांगली राहते. या औषधात असलेल्या प्रोटीन्समुळे शरीरातील सुजेवर नियंत्रण मिळवता येतं. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीत सुधारणा होऊन श्वसनासंबंधी समस्या कमी होतात.

रक्तदाबाच्या समस्येसाठी वापरात असलेल्या लोसार्टन या औषधांवरही सध्या परिक्षण सुरू आहे. यूनिवर्सिटी ऑफ मिनेसोटाचे तज्ञ या औषधाची चाचणी करत आहेत. या औषधामुळे कोरोना व्हायरसचे शरीरातील  रिसेप्टर ब्लॉक होऊन व्हायरस शरीरात पसरण्यापासून रोखता येईल. असा विश्वास तज्ज्ञांना आहे.  (CoronaVirus News : 'हे' नवीन औषध कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ठरेल प्रभावी, तज्ज्ञांचा दावा )

कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी अजून कोणतंही औषध किंवा लस शोधण्यात आलेली नाही. जोपर्यंत कोरोनाच्या औषधाबाबत संशोधन पूर्ण होत नाही तोपर्यंत रुग्णाचा जीव वाचवण्याासाठी कॅन्सर, बीपी आणि मानसिक आजारांवरच्या औषधांचा वापर केला जात आहे.

(लॉकडाऊनमध्ये चुकीच्या सवयींमुळे होऊ शकता लठ्ठपणाचे शिकार, आजंच बदला 'या' सवयी)

Web Title: CoronaVirus News Marathi: Research scientists test drugs cancer depression high bp treat coronavirus myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.