शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करता? मग वेळीच व्हा सावध अन्यथा....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 11:46 AM

जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर तुम्हाला याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

(Image Credit : ayurvedaupay.com)

हिवाळ्यात जवळपास सगळे लोक सर्रास गरम पाण्याने आंघोळ करतात. कारण थंड पाण्याला हात लावायची देखील कुणाची इच्छा होत नाही. तसेच गरम पाण्याने आंघोळ करण्याची आपलीच एक वेगळी मजा असते. कारण गरम पाण्याने शरीराला गरमी तर मिळतेच सोबतच आरामही मिळतो. मात्र, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर तुम्हाला याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

स्किन डॅमेज

(Image Credit : lopscoop.com)

गरम पाणी शरीरावर असलेल्या मॉइश्चरायजरला सहजपणे दूर करतं. पण जास्त वेळ गरम पाण्यात राहिलं किंवा अंगावर घेतलं तर स्किनवरील नॅच्युरल मॉइश्चर कमी होऊन स्किनचं नुकसान होतं. 

रॅशेज आणि इचिंग प्रॉब्लेम

जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्किन ड्राय होते आणि स्किनवर क्रॅक्स येऊ लागतात. हे भलेही दिसत नसतील पण याने रॅशेज आणि इचिंगची समस्या निर्माण होऊ शकते. असं झाल्यास डॉक्टरांना भेटल्याशिवाय पर्याय नसतो.

इन्फेक्शन

हिवाळ्यात साधारणपणे स्किन उलण्याची समस्या अधिक होते. त्यामुळे वातावरणातील बॅक्टेरिया सहजपणे स्किनमध्ये प्रवेश करतात. याने इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो. 

फर्टिलिटीवर प्रभाव

एका रिसर्चनुसार जर व्यक्ती ३० मिनटांपेक्षा अधिक वेळ गरम पाण्यात राहत असेल तर त्याच्या प्रजनन क्षमतेवर याचा प्रभाव पडतो. जास्त गरम पाण्यामुळे शुक्राणूं कमजोर होतात किंवा त्यांच्या निर्मितीवर परिणाम होतो.

सुरकुत्या येतात

गरम पाण्याने भलेही तुम्ही चेहरा धुवत नसाल पण पाण्याची वाफ चेहऱ्यावर येतेच. यामुळे स्किनचे पोर्स मोठे होतात. सोबतच स्किनचं मॉइश्चर डॅमेज होऊन सुरकुत्या येऊ शकतात.

केसगळती

(Image Credit : herzindagi.com)

गरम पाण्याने केस आणि डोक्याची स्किन ड्राय होते. यामुळे केस सहज तुटू लागतात. याने केसगळी वाढून डोक्यात खासही येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला टक्कल पडणं टाळायचं असेल तर जास्त गरम पाण्याने केस धुवू नका किंवा आंघोळ करू नका.

गरम पाण्याने किती वेळ आंघोळ करावी?

(Image Credit : vaaju.com)

एका रिसर्चनुसार, गरम पाण्याने १० ते १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करू नये. तसेच आंघोळीनंतर शरीरावर मॉइश्चर लावणं गरजेचं ठरतं. जेणेकरून स्किन ड्राय होऊ नये आणि इतरही काही समस्या होऊ नये.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी