शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

सुरकुत्या आणि पिंपल्स दूर करण्यासाठी कोथिंबीरचा खास फेसपॅक, तेलकट त्वचेसाठीही फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 11:31 AM

घरात कोथिंबीरचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, भाज्यांमध्ये वेगळ्या टेस्टसाठी जातो. मात्र, कोथिंबीर त्वचेच्या समस्या दूर करण्यासही फायदेशी ठरते हे अनेकांना माहीत नसतं.

(Image Credit : www.lifealth.com)

कोथिंबीरचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, भाज्यांमध्ये वेगळ्या टेस्टसाठी जातो. मात्र, कोथिंबीर त्वचेच्या समस्या दूर करण्यासही फायदेशी ठरते हे अनेकांना माहीत नसतं. कोथिंबीरीत अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन सी आणि फोलेट असतात. जे त्वचेवरील केवळ फ्री रॅडिकल्सच दूर करत नाही तर त्वचा मुलायम आणि चमकदार करतात. 

कोथिंबीरमध्ये अ‍ॅंटी-फंगल प्रॉपर्टीज असतात जे कोणत्याही प्रकारच्या स्कीन इन्फेक्शनपासून बचाव करतातत. त्यासोबतच वाढत्या वयाचे त्वचेवर दिसणारे संकेतही दूर केले जातात. कोथिंबीर तेलकट त्वचेसाठीही फायदेशीर असते. याने त्वचेवरील अतिरिक्त ऑइल दूर केलं जातं. यामुळे त्वचेवर पिंपल्सही येत नाहीत.

(Image Credit : Amar Ujala)

आता जर कोथिंबीरचे त्वचेसाठी इतके सगळे फायदे आहेत. तर याचा फेस मास्क किंवा पॅक लावण्यात काहीच गैर नाही. पण तुम्हाला हेही माहीत असलं पाहिजे की, कोथिंबीरमध्ये कोणत्या गोष्टी मिश्रित करून त्वचेवर सकारात्मक प्रभाव पडतो.

सुरकुत्या आणि ऑयली त्वचेचा पॅक

(Image Credit : Social Media)

त्वचा ग्लोइंग आणि ऑइल फ्री करायची असेल तर कोथिंबीरच्या पानांची पेस्ट तयार करा आणि त्यात अ‍ॅलोवेरा आणि लिंबाचा रस मिश्रित करा. अ‍ॅलोवेराचा जेल वापरण्याऐवजी अ‍ॅलोवेराचा पानांमघधील गर अधिक चांगला ठरेल. आता हे मिश्रण चांगल्याप्रकारे चेहऱ्यावर लावून अर्धा तास तसच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. याने त्वचेवर केवळ चमकदारपणाच येणार नाही तर त्वचेवरील सुरकुत्याही दूर होतील.

डेड स्कीन  दूर करण्यासाठी पॅक

कोथिंबीर तांदळाच्या पिठात मिश्रित करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. हे कॉम्बिनेशन त्वचेसाठी एक्सफोलिएटर म्हणून काम करतं. १ कप कोथिंबीरची पाने बारीक करा आणि २ चमचे तांदळाचं पीठ व एक लिंबाचा रस मिश्रित करा. हे मिश्रण चेहऱ्यावर अर्ध्या तासांसाठी लावून ठेवा नंतर चेहरा पाण्याने धुवावा.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स