बालपण व वृद्धापकाळातील झोपेचे प्रमाण सारखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:08 IST2016-01-16T01:20:24+5:302016-02-08T05:08:06+5:30

प्रत्येक वयातली सरासरी झोप ही वेगवेगळी असते. १४ ते २४ या वयोगटातील सरासरी झोप दोन तासांची असते तर २...

The childhood and the sleeping habits are the same | बालपण व वृद्धापकाळातील झोपेचे प्रमाण सारखेच

बालपण व वृद्धापकाळातील झोपेचे प्रमाण सारखेच

रत्येक वयातली सरासरी झोप ही वेगवेगळी असते. १४ ते २४ या वयोगटातील सरासरी झोप दोन तासांची असते तर २४ ते ३0 किंवा ३५ या वयोगटातील झोप दीड तास असते. हा दर वयाच्या ५५ वर्षापर्यंत कायम राहतो. १0 वषार्ंच्या मुलाची झोप आणि ५५ वर्षांच्या व्यक्तीची झोप नैसर्गिकरित्या सारखीच असते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. डॉ. पोल केले जे सध्या स्लिप अँण्ड सरकाडीयन न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी येथे वैद्यकीय संशोधक आहेत. त्यांनी या आठवड्यात झालेल्या ब्रिटीश सायन्स फेस्टिव्हलमध्ये शाळांना असे आवाहन केले की शाळांची वेळ जीवशास्त्रीयदृष्ट्या आणि नैसर्गिकरित्या सुसंगत असली पाहिजे. ज्यात विद्यार्थ्यांचाच फायदा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढेल, परीक्षांचे निकाल वधारतील आणि शिवाय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही चांगले परिणाम होतील. अपुर्‍या झोपेचा संबंध मधुमेह, नैराश्य, स्थुलता आणि रोगप्रतिकारकशक्तींशी येतो.
मागील वर्षी प्रसिद्ध झालेल्या प्रबंधात त्यांनी हे नमुद केले आहे की, वय वर्ष १0 च्या जवळपासची मुले सर्वसाधारणरित्या सकाळी साडेसहा वाजता उठतात. पण, सोळाव्या वर्षापर्यंत त्यांच्या उठण्याची वेळ सकाळी आठची होते आणि अठराव्या वर्षांपर्यंत ते आळशी होतात. खरे तर नैसर्गिकदृष्ट्या उठण्याची वेळ सकाळी नऊची आहे. सर्वसाधारणरित्या शाळांची वेळ ही दहा वर्षाच्या मुलांसाठी साजेशी असते. १६ किंवा १८ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी नाही. किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी शाळांची वेळ सकाळी ११ ची असते. त्याचप्रमाणे प्रौढांना सकाळी सात वाजता उठणे हे वयाच्या पन्नाशीत असलेल्या शिक्षकांना सकाळी साडेचार वाजता उठविण्यासारखेच आहे, असा मुद्दा केले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उपस्थित केला आहे.
ते पुढे असेही म्हणतात की, किशोरवयीन मुलांना लवकर झोपविण्याचा प्रयत्न करणे ही सोपी गोष्ट नाही. शरीराचा नैसर्गिक समतोल हा एका विशिष्ट प्रकारच्या प्रकाश किरणांनी नियंत्रित केला जातो.
डोळ्यांमध्ये सेल्स असतात. जे दृष्टीचा अहवाल मेंदूमधल्या दृष्टीशी संबंधित भागाला पोहोचवतो. मेंदूचा हा भाग सर्काडिअन ठोक्यांना २४ तास नियंत्रित करतो. मुळात तो एक प्रकाश असतो. जो नियंत्रण सांभाळत असतो. म्हणूनच आपण हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करू शकत नाही.
योग्य वेळेत कामाची सुरुवात करून फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर इतरांनाही फायदा होतो, याकडेही डॉ. केले यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: The childhood and the sleeping habits are the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.