डागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST
हळदीत आढळणा-या अॅन्टिसेप्टिक गुणांमुळे त्वचेच्या सौंदर्यात मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने हळदीचा वापर उपयुक्त ठरतो.
डागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त!
हळद जेवढे आरोग्यदायी तेवढेच सौंदर्यवर्धकही आहे.हळदीत आढळणा-या अॅन्टिसेप्टिक गुणांमुळे त्वचेच्या सौंदर्यात मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने हळदीचा वापर उपयुक्त ठरतो. जाणून घेऊया डागरहित उजळ त्वचेसाठी हळदीचे गुणकारी फेस पॅकची उपयुक्तता... * हळद आणि दही एक चमचा हळद पावडर, एक चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही पेस्ट चेहºयावर लावा. पंधरा मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरा. डाग नक्की साफ होतील.* हळद आणि काकडीचा रस हळद आणि काकडीने त्वचा उजळेल. यासाठी एक चमचा हळदीत दोन चमचे काकडीचा रस मिसळा आणि चेहºयावरील डागांवर लावा. पेस्ट वाळल्यावर चेहरा धुऊन टाका. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा. * हळद आणि लिंबाचा रस ताज्या लिंबाच्या रसात चिमूटभर हळद मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. ही चेहºयावर लावून पंधरा मिनिट राहून द्या. नंतर चेहरा धुऊन पुसून घ्या आणि मॉइस्चराइजर लावा.* हळद आणि चंदन पावडरएक चमचा चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि जरासं मध मिसळा. चेहºयावर २० मिनटांसाठी लावून ठेवा आणि मग पाण्याने धुऊन टाका. * हळद, दूध आणि मधदोन चमचे दूध आणि एक चमचा मधासोबत एक चमचा हळद मिसळा. ही पेस्ट चेह-यावर लावा आणि पंधरा मिनिटानंतर चेहरा धुऊन टाका. याने हळू-हळू चेहºयाचे सर्व डाग दूर होतील.