शेविंगआधी हा फंडा वापराल, तर त्वचेवरची जळजळ कायमची विसराल अन् हॅण्डसमही दिसाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 11:03 AM2020-02-19T11:03:34+5:302020-02-19T11:19:24+5:30

पुरूष आपला चेहरा चांगला दिसावा यासाठी अनेक प्रयत्न करत असतात.

Best shaving tips for man will prevent from burning after shaving | शेविंगआधी हा फंडा वापराल, तर त्वचेवरची जळजळ कायमची विसराल अन् हॅण्डसमही दिसाल!

शेविंगआधी हा फंडा वापराल, तर त्वचेवरची जळजळ कायमची विसराल अन् हॅण्डसमही दिसाल!

Next

पुरूष आपला चेहरा चांगला दिसावा यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. पण दाढी करताना किंवा कोणतीही क्रिम वापरत असताना आपण अनेक चुका करत असतो. त्यामुळे हवा तसा लूक येत नाही. सध्याच्या काळात लोकांकडे जास्त वेळ नसतो. त्यामुळे आपली लाईफस्टाईल मेन्टेंन करण्यासाठी  फारसा वेळ मिळत नाही.

(image credit- groom= style)

दररोज कामासाठी बाहेर पडत असताना नेहमी प्रेजेंटेबल दिसण्यासाठी शेविंग करावी लागते. त्याचा आपल्या चेहरा आणि त्वचेवर खूप फरक पडत असतो. शेविंग करण्याआधी तुम्ही तुमच्या त्वचेला हात ओला करून मसाज द्या. असं केल्यास त्वचेची चमक कमी होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या अशा टिप्स आहेत. ज्यांचा वापर करून तुम्ही आपला चेहरा चांगला बनवू शकता. 


(image credit- buisness insider)

शेविंग किट स्वच्छ ठेवा

शेविंग करण्याआधी तुमचं शेविंग किट स्वच्छ ठेवा. असं केल्यास शेविंग केल्यानंतर कोणतंही इन्फेक्शन होणार  नाही.  तसचं तुम्ही पिंपल्सच्या समस्येपासून स्वतःला लांब ठेवू शकता.  तुमचं शेविंग किट साफ करण्यासाठी डेटॉल किंवा गरम पाण्याचा वापर करा. 

शेविंग ब्रश चांगला असावा

शेविंग करण्याआधी नेहमी शेविंग क्रिमला चांगल्या ब्रशने त्वचेला लावा. लक्ष असू द्या की शेविंग ब्रश खूप मऊ आणि मुलायम असवा. त्यामुळे तुमची त्वचा चांगली दिसून येईल.

(image credit- huffpost)

कोरड्या त्वचेसाठी

कोरडी त्वचा असेल तर शेविंग करण्याच्या आदल्या दिवशी झोपताना दाढीच्या त्वचेला आणि केसांना राईचं किंवा बदामाचं तेल लावा. त्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होईल आणि तुमच्या त्वचेवर चमक टिकून  राहील. 

उभ्या केसांसासाठी

काही लोकांच्या दाढीचे केस उभे  असतात. त्यासाठी गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल आपल्या त्वचेवर ठेवा.  २ ते ३ मिनिट हा टॉवेल असाच राहू द्या. हा प्रयोग केल्यास शेविंग केल्यानंतर त्यांना जराही प्रोब्लेम येणार नाही. 

(image credit- beard berry)

जळजळ होऊ नये

काहीजणांना शेविंग केल्यानंतर जळजळ होत असते. त्यासाठी त्वचेवर एक चमचा दही दोन मिनिट लावून ठेवा. नंतर चेहरा धुवून टाका. शेव केल्यानंतर मऊ टॉवेलने चेहरा पुसा. रखरखीत कापडाचा वापर केला तर पुळ्या येण्याची शक्यता असते. 

क्रिमचा वापर 

कोणतीही  शेविंग क्रिम त्वचेला लावल्यानंतर लगेच शेव करू नका. कारण त्यामुळे त्वचेला इजा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे क्रिम लावल्यानंतर ३ ते ४ मिनिटांनंतर  शेव करा. शेव करताना नेहमी नवीन ब्लेडचा वापर करा. ( हे पण वाचा-त्वचेवरील सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी 'असा' वापरा बटाटा, मग बघा कमाल!)

(image credit- wikipedia)

डेटॉलचा वापर 

शेविंग केल्यानंतर इन्फेक्शन होऊ नये यासाठी डेटॉलचा वापर करायला विसरू नका. कारण त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं  इन्फेक्शन होणार नाही. त्वचेवरील किटाणू नष्ट होतील. ( हे पण वाचा-घरच्याघरी केवळ २ मिनिटात प्रायमर तयार करून वाचवा पार्लरचा खर्च!)

Web Title: Best shaving tips for man will prevent from burning after shaving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.