​Beauty : पाठ आकर्षक दिसण्यासाठी अभिनेत्री घेतात ‘ही’ काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2017 09:53 AM2017-06-17T09:53:43+5:302017-06-17T15:23:43+5:30

पाठ आकर्षक दिसण्यासाठी खास टिप्स

Beauty: The actress takes a look at the look attractive; | ​Beauty : पाठ आकर्षक दिसण्यासाठी अभिनेत्री घेतात ‘ही’ काळजी !

​Beauty : पाठ आकर्षक दिसण्यासाठी अभिनेत्री घेतात ‘ही’ काळजी !

Next
रीरिक सौंदर्य ही अभिनेत्रींची खरी ओळख. चेहरा, हात, पाय, मान तसेच पाठीचेही सौंदर्य टिकण्यासाठी त्या अतोनात प्रयत्न करतात आणि तशी मेहनतही घेतात. सध्या चित्रपटात असो की मालिका असो त्यात बहुतांश अभिनेत्र्या बॅकलेस ड्रेस परिधान करताना दिसत आहेत. त्यांचेच अनुकरण करीत महिलांमध्ये बॅकलेसची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. 
मात्र महिला आणि तरुणी आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढविण्याकडे जास्त लक्ष देतात म्हणून त्यांच्या पाठीकडे दुर्लक्ष होते ज्यामुळे पाठ काळपट पडण्यास सुरुवात होते.

p8

विशेषत: अभिनेत्री असे होऊ देत नाही. ते आपल्या पाठीची परिपूर्ण काळजी घेतात. ज्यामुळे त्यांची पाठ आकर्षक व सुंदर दिसते आणि त्यांना बॅकलेस ड्रेस परिधान करण्यास काहीही अडचण येत नाही. 
आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमची पाठ खुपच आकर्षक आणि सुंदर बनवू शकाल. 

* दररोज आंघोळ करताना आपली पाठ चांगल्या प्रकारे घासून साफ करावी, पाठ स्वच्छ करण्यासाठी सध्या मार्केटमध्ये हँडल असलेला ब्रशही उपलब्ध आहेत. त्याच्या सहाय्याने अगदी सहजच पाठ साफ आणि स्वच्छ करता येईल

* दररोज आंघोळ केल्यानंतर आपल्या पाठीवर कोल्ड क्रीम किंवा मॉईश्चरायझर जरुर लावावे

* पाठीवर काळे डाग पडले असल्यास त्यावर चंदन, आंबेहळद आणि जायफळ उगाळून लावावे. तसेच हळद आणि लिंबू एकत्र करुन हे मिश्रण लावल्यानेही त्वचेवर चमकदारपणा येईल.

* आपली पाठ सुंदर आणि आकर्षक बनविण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी पाठीची मसाज करावी. 



 

Web Title: Beauty: The actress takes a look at the look attractive;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.