अँटिबायोटिक प्रतिकारामुळे रुग्णांच्या जीवाला धोका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:32 IST2016-01-16T01:17:37+5:302016-02-07T07:32:21+5:30
केमोथेरपी, इतर सर्जरीननंतर किंवा उपचारादरम्यान प्रतिजैविकांना प्रतिकार (अँटिबायोटिक रेझिस्टन्स) वाढल्यामुळे रुग्णांच्या जीवाला फार मोठा धोका उद्भवू शकतो, असा दावा नव्या संशोधनांती करण्यात आला आहे.

अँटिबायोटिक प्रतिकारामुळे रुग्णांच्या जीवाला धोका...
मेरिकेमध्ये सर्जरी नंतर ससंर्गाची (इन्फेक्शन) लागण झालेल्या अध्र्यापेक्षा जास्त केसेसमध्ये प्रतिजैविकांना होणारा प्रतिकारच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. केमोथेरपी नंतर याचेच प्रमाण २५ टक्के रुग्णांना अँटिबायोटिक रेझिस्टन्समुळे संसर्ग झाल्याचे अभ्यासात दिसून आले. तज्ज्ञांच्या मते, प्रतिजैविकांची परिणामकारिता जर ३0 टक्क्यांनी कमी झाली तर १.२ लक्ष लोकांना इनफेक्शन तर ६३00 हजार लोकांवर संसर्गामुळे मृत्यू ओढावू शकतो. 'प्रतिजैविकांना प्रतिकार करण्याबाबत अमेरिकेमध्ये अशा प्रकारचे प्रथमच इतक्या व्यापक प्रमाणावर संशोधन केले गेले आहे,' असे सेंटर ऑफ डिसिज डायनामिक्स, इकोनॉमिक्स अँड पॉलिसीचे संचालक रामणन लक्ष्मीनारायण यांनी सांगितले.