शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
4
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
5
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
6
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
7
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
8
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
9
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
10
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
11
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
12
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
13
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
14
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
15
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
16
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
17
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
18
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
19
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
20
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

गरजेपेक्षा जास्त खाण्याची 5 कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:52 IST

आजकाल लोक 'हेल्थ कॉन्शिअस' म्हणजे आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. व्यायाम आणि पोषक आहाराला ते महत्त्...

आजकाल लोक 'हेल्थ कॉन्शिअस' म्हणजे आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. व्यायाम आणि पोषक आहाराला ते महत्त्व देतात. इतके असूनही काही ना काही कारणांमुळे बर्‍याचदा आपल्याकडून अनहेल्थी पदार्थ खाल्ले जातात. आणि मग दुसर्‍या दिवशी आपण त्याचावर विचार करत बसतो. परंतु स्ट्रिक्ट डाएट प्लॅन असूनही आपण गरजेपेक्षा जास्त का खातो या मागे काही कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख कारणे म्हणजे :


१. मित्र
मित्रमंडळी म्हटले की दिवसभर अचरबचर खाणे आलेच. गप्पा-गोष्टींच्या ओघात मग समोसे, कचोरी, बर्गर, पिझ्झा तर मागावलाच जातो. आता मित्रांना कसे नाही म्हणणार या भीतीमुळे कळत-नकळत आपण आरोग्यास नुकसानदायी पदार्थ खातो. पण स्वत:च्या तब्येतीची काळजी जास्त महत्त्वाची. मित्रांना खरे कारण सांगा. ते नक्कीच समजून घेतील.


२. थकवा
बरेच लोक थकवा आला म्हणजे भूक लागली अशी गफलत करतात. अपुर्‍या झोपेमुळेदेखील थकवा जाणवू शकतो. त्यामुळे दररोज ६-८ तास झोप अत्यंत गरजेची आहे. तसेच लक्ष द्या की दिवसाच्या कोणत्या वेळेला तुम्हाला असा थकवा जाणवतो. याचा पॅटर्न समजला तर जंक फुड खाण्यावर तुम्ही लगाम लावू शकता.


३. घाईमध्ये खाणे
जे लोक घाईघाईमध्ये जेवण करतात ते गरजेपेक्षा जास्त खातात. जर तुम्ही १0 मिनिटांच्या आत ताटावरून उठत असाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. आरामशीर, कसलीही घाई न करता, एक-एक घास चावत खा. त्यामुळे पचनही चांगल्या पद्धतीने होते.


४. बोअर होणे
काही सुचतच नाहीए, एकदम बोअर होतय, काही करायलाच नाही म्हणून किती तरी लोक उगीच गरज नसताना खातात. जगातील सगळ्यात जास्त लोक हे कंटाळा आला म्हणून खातात आणि ओव्हरइटिंगचे शिकार होतात. त्यामुळे स्वत:ला कामात व्यस्त ठेवून अशा वाईट सवयीपासून स्वत:ला दूर ठेवा.


५. पाण्याचे प्रमाण कमी
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले तर आपल्या तहानभूक जास्त लागते. त्यामुळे सदैव पाण्याची बॉटल जवळ ठेवा. दिवसभरातून अधूनमधून सतत पाणी पित राहा. जेवणाआधी एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. झोपताना आणि उठल्यावरही पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते.