शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

जागतिक शालेय बॅडमिंटन : भारताच्या मुलींची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 2:08 AM

महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघाच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या गटात भारत ‘अ’ संघाने शुक्रवारी ब्राझीलवर मात करून विजयी सलामी दिली.

पुणे : महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघाच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या गटात भारत ‘अ’ संघाने शुक्रवारी ब्राझीलवर मात करून विजयी सलामी दिली.म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. मुलींच्या गट-२ मध्ये भारत ‘अ’ संघाने ब्राझीलवर ५-०ने मात केली. यातील दुहेरीच्या पहिल्या लढतीत निकिता संजय-अंजना कुमारी जोडीने मारिया रोचा-लोरेना व्हिएरा जोडीवर १९-२१, २१-१९, २१-१७ असा विजय मिळवला. यानंतर शिवप्रिया-चिमरन कलिता जोडीने माद्रदो-ग्लेयसी मौरा जोडीवर २१-७, २१-१२ अशी मात केली. एकेरीत निकिताने मारियावर २१-१४, २१-१० असा, प्रेरणा अल्वेकरने सिझिअने फेरोवर २१-६, २१-८ असा, तर कलिताने लोरेनावर २१-१३, २१-१३ असा विजय मिळवला. शालेय गटातील मुलींच्या गट-१मध्ये चीनने भारत ‘अ’ संघावर ५-० ने मात केली.मुलांमध्ये भारताच्या ‘अ’ संघाची ‘ब’ संघावर मातमुलांच्या गटात भारत ‘अ’ संघाने भारत ‘ब’ संघावर ५-०ने मात केली. यात दुहेरीत रितूपर्णा बोरा-त्रिखा वरुण जोडीने आर्यमन-अनिश जोडीवर २१-१६, ८-२१, २१-१६ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. यानंतर मन्नेपल्ली तरुण-पारस माथूर जोडीने गौतम - अर्जुन जोडीवर २१-१८, २१-१८ अशी मात केली. यानंतर एकेरीत मोनिमुग्धाने अनिरुद्धसिंगचे आव्हान २१-१५, १४-२१, २१-१२ असे परतवून लावले. यानंतर तरुणने अर्जुनवर २१-१६, १८-२१, २१-१० अशी, तर पारसने गौतमवर २१-१९, २१-१८ अशी मात केली.शालेय गटात पराभवाने सुरुवातशालेय गटातील मुलींच्या गट-१मध्ये चीनने भारत ‘अ’ संघावर ५-०ने मात केली. यातील एकाही लढतीत भारतीय मुलींना चीनच्या मुलींसमोर आव्हान निर्माण करता आले नाही. यातील पाचही लढती एकतर्फीच झाल्या. मुलांच्या गट-१मध्ये चीनने भारत ‘ब’ संघावर ५-०ने सहज मात केली. मुलांच्या गट-२मध्ये इंग्लंडने भारत अ संघाचा ५-०ने धुव्वा उडविला.

टॅग्स :BadmintonBadminton