शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सायना नेहवाल, के. श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 5:59 AM

सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी महिला आणि पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

बर्मिंघम : सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी महिला आणि पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायनाने डेन्मार्कच्या होमार्कला तर श्रीकांतने जोनाथन ख्रिस्तीला पराभूत केले.आॅलिम्पिकची माजी कांस्य विजेती सायनाने लाइन होमार्क जॉर्सफेल्टविरुद्ध रोमहर्षक सामन्यात विजय संपादन केला. सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या सायनाने शानदार कामगिरी करत हा सामना ८-२१,२१-१६,२१-१३ असा विजय मिळवला. सातव्या मानांकित श्रीकांतने आशियाई चॅम्पियन जोनाथन ख्रिस्ती याला २१-१७,११-२१,२१-१२ असे पराभूत केले.पुढील फेरीत सायनाचा सामना चीनी तैपैच्या ताइ ज्यु यिंग हिच्याशी होण्याची शक्यता आहे. ताइ ज्यु यिंगने मागील १२ सामन्यात सायनाला पराभूत केलेले आहे . श्रीकांतचा सामना जपानच्या केंटो मोमोटा याच्याशी होणार आहे.तत्पुर्वी सायनाने बुधवारी उशिरा रात्री स्कॉटलंडची ख्रिस्टी गिलमोर हिचा ३५ मिनिटात २१-१७,२१-१८ ने पराभव केला. श्रीकांतने फ्रान्सचा ब्राइस लेवरडेज याच्यावर एकतर्फी लढतीत २१-१३,२१-११ ने विजय नोंदविला.बी साईप्रणीतला दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. हाँगकाँगच्या लोंग एंगस् याने त्याला १२-२१, १७-२१ असे पराभूत केले. समीर वर्मा याने पहिला गेम जिंकल्यानंतरही माजी विश्व विजेता आणि जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू व्हिक्टर एक्सलसन याला २१-१६,१८-२१,१४-२१ असे पराभूत केले.अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी या जोडीलादेखील शिहो तनाका-कोहारू योनेमोतो या जपानच्या सातव्या मानांकित जोडीकडून २१-२३, १७-२१ ने पराभव पत्करावा लागला.सिक्की रेड्डी आणि जखमेतून सावरलेला प्रणव जेरी चोप्रा यांच्या मिश्र जोडीला चांग टेक चिग-विग युंग या हाँगकाँगच्या जोडीकडून २१-२३, १७-२१ ने पराभवाचा धक्कका बसला. मनू अत्री-सुमित रेड्डी यांची जोडी चीनचे ओयू शुयान्यी-रेन शियांग्यू यांच्याकडून १९-२१, २१-१६, १४-२१ ने पराभूत झाली.>नियमित सुपर सीरिज स्पर्धांच्या तुलनेत आॅल इंग्लंडमधील सामने अधिक आव्हानात्मक असतात. सर्वजण चषक जिंकू इच्छितात; पण सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावाच लागतो. ’’- सायना नेहवाल

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवाल