शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

सायना नेहवालच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, फुलराणी रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 12:21 PM

ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या सायना नेहवालला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हैदराबाद : नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या सायना नेहवालला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात दुखत असूनही ती ऑल इंग्लंड स्पर्धा खेळली, पण तिचे हे दुखणे वाढले आहे आणि त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुखण्यामुळे तिला आगामी स्वीस ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत लिहिले की,''तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. सोमवारपासून माझ्या पोटात वेदना होत होत्या, पण तरिही मी ऑल इंग्लंड स्पर्धेत काही सामने खेळले. पण, आता या वेदना असह्य झाल्यामुळे आगामी स्वीस ओपन स्पर्धेतून माघार घेत आहे. डॉक्टरांनी मला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. आशा करते की लवकरच कोर्टवर परतेन.''  सायनाला शुक्रवारी ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या तैवानच्या ताय त्झु यिंगकडून हार मानावी लागली. सायनाला सलग 13व्या सामन्यात तैवानच्या खेळाडूकडून हार मानावी लागली. ताय ज्यू ने ३७ मिनिटांत १५-२१, १९-२१ ने पराभूत केले. उभय खेळाडूंमध्ये झालेल्या २० पैकी केवळ पाच सामन्यांत सायनाने बाजी मारली आहे.  

सायनावर तिने पहिल्या गेममध्ये ११-३ अशी आघाडी घेतली होती. नंतर सायनाने १२ पैकी नऊ गुण संपादन करीत १४-१२ अशी पिछाडी भरून काढली. ताय ज्यू ने आघाडी वाढवून २०-१३ अशी केली व पाठोपाठ गेम जिंकला. प्रतिस्पर्धी खेळाडूची दमदार कामगिरी दुसऱ्या गेममध्येही कायम राहिली. तिने ११-८ अशी प्रारंभी आघाडी मिळविली होती. सायनानेदेखील प्रतिकार केल्यामुळे गुणफलक १७-१५ आणि थोड्याच वेळात १९-१९ असा झाला. ताय ज्यू ने सलग दोन गुणांची कमाई करीत गेम आणि सामना जिंकला. 

लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सायनानं भारताला अनेक अविश्वसनीय जेतेपद जिंकून दिली. 2018 मध्ये तीने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकाची कमाई केली. तिने महिला एकेरी व मिश्र दुहेरी गटात बाजी मारली. शिवाय आशियाई स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने दोन कांस्यपदक जिंकले.  

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton