#MeToo : भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानेही केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 03:04 IST2018-10-10T03:03:45+5:302018-10-10T03:04:16+5:30
भारताची आघाडीच्या महिला बॅडमिंटनपटूने एक एक खळबळजनक खुलासा केला असून आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. संघटनांतील अध्यक्ष झाल्यावर एका व्यक्तीने माज्याबरोबर गैरव्यवहार केल्याचेही या खेळाडूने सांगितलं आहे.

#MeToo : भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानेही केला आरोप
मुंबई : भारताची आघाडीच्या महिला बॅडमिंटनपटूने एक एक खळबळजनक खुलासा केला असून आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. संघटनांतील अध्यक्ष झाल्यावर एका व्यक्तीने माज्याबरोबर गैरव्यवहार केल्याचेही या खेळाडूने सांगितलं आहे. ‘#मी टू’ या कॅम्पेनच्या माध्यमातून सध्या विविध क्षेत्रातील महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टाने ट्विटरवर एक मेसेज पोस्ट केला आहे. या मेसेजमध्ये ज्वालाने आपल्यासोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक मेसेज पोस्ट केला आहे. एका व्यक्तीमुळे माझी कारकीर्द संपली, असा खुलासाही ज्वालाने यावेळी केला.