शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सिंधूकडे नेतृत्वाचा भार, हाँगकाँग सुपर सिरीज, आजपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 3:19 AM

गेल्या एक महिन्यापासून सलग पाच स्पर्धा खेळणारी आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू हिच्याकडे हॉँगकॉँग सुपर सिरीज स्पर्धेचे नेतृत्व असेल.

कोवलून (हॉँगकॉँग) : गेल्या एक महिन्यापासून सलग पाच स्पर्धा खेळणारी आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू हिच्याकडे हॉँगकॉँग सुपर सिरीज स्पर्धेचे नेतृत्व असेल. ४० हजार डॉलर रकमेच्या या स्पर्धेसाठी जेव्हा ती कोर्टवर उतरेल तेव्हा तिला थोडा थकव्याचाही सामना करावा लागेल. कारण ती सतत खेळत आली आहे. सलग खेळत असल्यामुळे तिची हालचालही थोडी संथ झाली आहे. शॉट्समध्येही आक्रमकता दिसत नाही. त्यामुळे तिला शारीरिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.गेल्या आठवड्यात चीन ओपन सुपर सिरीज प्रीमिअर स्पर्धेत चीनच्या युवा खेळाडूकडून सिंधू पराभूत झाली होती.भारतीय खेळाडूंना या पराभवातून लवकरच बाहेर यावे लागेल. पहिल्याच फेरीत त्यांना सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन करावे लागेल. पहिल्या फेरीत विजय मिळविल्यानंतर सिंधू सरळ उपांत्यपूर्व फेरी गाठेल आणि तिचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्याविरुद्ध होईल. ही खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून तिने गेल्याच आठवड्यात चीन ओपनचा किताब पटकाविला होता. त्यामुळे सिंधूचा प्रवास खडतर असेल.इतर भारतीयांमध्ये राष्ट्रीय विजेती सायना नेहवाल आणि एचएस प्रणयसुद्धा सिंधूप्रमाणेच सलग खेळत आहेत. प्रणय याला पहिल्या फेरीत हॉँगकॉँगचा अनुभवी हू युन याच्याविरुद्ध खेळावे लागणार आहे, तर सायनाचा सामना डेन्मार्कच्या मेट पालसनेविरुद्ध होईल.

टॅग्स :BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधू