शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

'सुवर्णकन्या' सिंधू भारताची शान; पंतप्रधान मोदींकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 14:52 IST

सुवर्णरत्न पी. व्ही. सिंधूनं नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

नवी दिल्ली : सुवर्णरत्न पी. व्ही. सिंधूनं नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. 2017 व 2018 मध्ये अंतिम फेरीत धडक मारूनही सिंधूला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. पण, यंदा सुवर्णपदकाशिवाय माघारी जायचं नाही, या ठाम निर्धाराने ती कोर्टवर उतरली. 40 मिनिटांहून कमी कालावधीत सिंधूनं जापानच्या नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा पराभव करून इतिहास घडवला. तिच्या या विक्रमी कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक झाले. सुवर्णपदकासह मायदेशात परतलेल्या सिंधूची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. सिंधू तू भारताची शान आहेस, असे गौरोद्गार मोदींनी उच्चारले. 

मोदी म्हणाले की,''भारताची शान, भारताला सुवर्णक्षणाचा साक्षीदार बनवणाऱ्या पी. व्ही. सिंधूला भेटून आनंद झाला. तिचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.''  सिंधूनं 2013 व 2014 मध्ये कांस्यपदक जिकंले, तर 2017 व 2018मध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 2017च्या अंतिम सामन्यात ओकुहाराकडूच भारतीय खेळाडूला पराभव पत्करावा लागला होता. या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली.

या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत. जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताने आतापर्यंत 1 सुवर्ण,  3 रौप्य व 6 कांस्यपदकांसह एकूण 10 पदकांची कमाई केली आहे. त्यापैकी पाच पदकं सिंधूच्या नावावर आहेत.

तत्पूर्वी, सिंधू आणि मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांनी क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली. रिजिजू यांनी सिंधूला 10 लाखांचा धनादेश बक्षीस म्हणून दिला. यावेळी बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष हिमंता बिस्वा शर्मा, प्रशिक्षक गोपिचंद आमि किम जी-ह्यून, सिंधूचे वडील पी व्ही रमण हेही उपस्थित होते.

याच स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या बी साई प्रणिथलाही क्रीडा मंत्रालयाने 4 लाखांचा धनादेश दिला. 

सुवर्ण'सिंधू'; जागतिक स्पर्धेत जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय

सुवर्णपदक जिंकून सिंधूनं आईला दिलं बर्थ डे गिफ्ट

याची देही याची डोळा, पाहा 'सुवर्णसिंधू'च्या ऐतिहासिक विजयाचा सोहळा

ऑगस्ट महिना सिंधूसाठी आहे लकी; पाहा ही थक्क करणारी कामगिरी

जगज्जेत्या पी.व्ही. सिंधूला घरातूनच मिळाले बाळकडू; जाणून घ्या, तिच्या प्रवासाबद्दल...

 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूNarendra Modiनरेंद्र मोदीBadmintonBadminton