BWF World C'ships 2019 final: Highlights of PVSindihu fulfills a perfect week in Basel securing the first world title of her career | BWF World C’ships 2019 final : याची देही याची डोळा, पाहा 'सुवर्णसिंधू'च्या ऐतिहासिक विजयाचा सोहळा

BWF World C’ships 2019 final : याची देही याची डोळा, पाहा 'सुवर्णसिंधू'च्या ऐतिहासिक विजयाचा सोहळा

स्वित्झर्लंड, जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले. सिंधूनं हा सामना 21-7, 21-7 असा जिंकला. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. 

या सामन्याचे हायलाईट्स

आईला बर्थ डे गिफ्ट
सामन्यानंतर सिंधू म्हणाली,'' या क्षणाची मी आतुरतेनं वाट पाहत होती. हा विजय माझ्यासाठी खास आहे. आजच्याच दिवशी हा विजय मिळवल्यानं आनंद द्विगुणित झाला आहे. कारण आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. ही तिला माझ्याकडून मिळालेली आतापर्यंतची सर्वोत्तम भेट असेल.'' 

ती पुढे म्हणाली, ''या विजयाची मी प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा करत होते. अखेरीस मी वर्ल्ड चॅम्पियन झाले. ही अंतिम लढत आहे असे मी डोक्यात ठेवले नाही. माझे संपूर्ण लक्ष या सामन्यावर होते. अन्य लढतीप्रमाणे मी हा सामना खेळले. त्यामुळे कोणतेही दडपण आले नाही. बऱ्याच काळापासून मी या दिवसाची वाट पाहत होते.'' 

अभिनंदनाचा वर्षाव


जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेते भारतीय
1983 - प्रकाश पादुकोण ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक
2011 - ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा ( महिला दुहेरी) - कांस्यपदक
2013 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक
2014 -   पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - कांस्यपदक
2015 - सायना नेहवाल ( महिला एकेरी) - रौप्यपदक
2017 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक
2017- सायना नेहवाल ( महिला एकेरी) - कांस्यपदक
2018 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - रौप्यपदक
2019 - बी साई प्रणित ( पुरुष एकेरी) - कांस्यपदक
2019 - पी. व्ही. सिंधू ( महिला एकेरी) - सुवर्णपदक
 

Web Title: BWF World C'ships 2019 final: Highlights of PVSindihu fulfills a perfect week in Basel securing the first world title of her career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.