शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

Denmark Open Badminton : सहा वर्षांनंतरही सायनाला जेतेपदाची हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 4:32 PM

Denmark Open Badminton : सहा वर्षांनंतर डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सायना नेहवालला जेतेपदाने हुलकावणी दिली.

डेन्मार्क : सहा वर्षांनंतर डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सायना नेहवालला जेतेपदाने हुलकावणी दिली. तैपेईच्या ताय त्झु यिंगने सायनाला पराभूत केले आणि डेन्मार्क स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सलग अकरा सामन्यांत यिंगने सायनावर विजय मिळवण्याचा पराक्रम केला. 

सायना आणि यिंग यांच्यात सहाव्या गुणासाठी 38 शॉट्सची रॅली रंगली. यिंगने 5-1 अशी आघाडी घेताना सायनावर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जोरकर स्मॅश आणि नेट प्लेसिंगचा उत्तम खेळ करताना यिंगने आघाडी 8-3 ने वाढवली. मात्र, सायनाने हार न मानता पिछाडी 8-13 अशी कमी करण्याचा प्रयत्न केला. सामना 19-13 अशा आघाडीवर असताना सायनाने फाऊल करत यिंगला गेम जिंकण्याची संधी दिली. यिंगने पहिला गेम अवघ्या 15 मिनिटांत 21-13 असा घेतला. 

सायनाने दुसऱ्या गेममध्ये अगदी सावध खेळावर भर दिला. तिने यिंगच्या प्रत्येक खेळाचा अभ्यास करताना 5-2 अशी आघाडी घेतली, परंतु यिंगने जोरदार कमबॅक केला. सायनाचे फटके परतवताना यिंगने अनेकदा कॉक सोडण्यावर भर दिला. पण तिचे अंदाज चुकले. सायनाने त्याचाच फायदा घेत 10-5 अशी आघाडी वाढवली. त्यानंतर सायनाने खेळ उंचावताना सामन्यावर पकड घेतली. प्रत्येक गुणासोबत तिची जिंकण्याची जिद्द वाढताना दिसत होती. सायनाने हा गेम 21-13 असा घेत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.तिसऱ्या गेममध्ये सायनाच्या हातून सामना निसटताना दिसला. यिंगने 11-2 अशी आघाडी घेत निकाल स्पष्ट केला होता. यिंगने हा गेम 21-6 असा जिंकून जेतेपद पटकावले.

  • सायनाने 21 ऑक्टोबर 2012 मध्ये पहिले आणि एकमेव डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. 

  • सायना आणि ताय त्झु यिंग यांच्यात आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांत तैपेईच्या खेळाडूचे पारडे जड आहे. यिंगने 12 वेळा सायनाला पराभूत केले आहे, तर सायनाला केवळ पाच विजय मिळवता आलेले आहेत. 
  • सायनाने 2013 मध्ये यिंगवर अखेरचा विजय मिळवला होता. स्वीस ओपन स्पर्धेत सायनाने 21-11, 21-12 अशी बाजी मारली होती, त्यानंतर सलग दहा सामन्यांत यिंगविरुद्ध सायनाची विजयाची पाटी कोरीच राहिली आहे.
टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton