शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन : साईप्रणित, समीर वर्मा दुसऱ्या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:49 AM

दुसरा मानांकित भारतीय बॅडमिंटनपटू बी. साईप्रणित आणि चौथा मानांकित समीर वर्मा यांनी आश्वासक सुरुवात करीत बुधवारी सुरू झालेल्या आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

सिडनी : दुसरा मानांकित भारतीय बॅडमिंटनपटू बी. साईप्रणित आणि चौथा मानांकित समीर वर्मा यांनी आश्वासक सुरुवात करीत बुधवारी सुरू झालेल्या आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.प्रणितने इस्रायलचा मिशा जिल्बरमॅन याचा सरळ गेममध्ये २१-१७,२१-१४ ने पराभव केला. समीरला मात्र न्यूझीलंडचा अभिनव मनोता याचा १३-२१, २१-१७,२१-१२ ने पराभव करण्यास बराच घाम गाळावा लागला.समीरचा भाऊ सौरभ वर्मा हाकडव्या संघर्षात जपानचा ताकुमा उएदा याच्याकडून २१-१९, १७-२१, १२-२१ ने पराभूत झाला. बिगर मानांकित अजय जयराम यालादेखील जपानचा रिची ताकेशिता याच्याकडून एक तास १२ मिनिटांत २२-२०,२०-२२,१७-२१ ने पराभव पत्करावा लागला. अन्य एका लढतीत करण राजन हा इंडोनेशियाच्या डुबी कुनकोरा याच्याविरुद्ध १५-२१, ८-२१ अशा गुणांनी सरळ दोन गेममध्ये पराभूत झाला. (वृत्तसंस्था)सायना आणि सिंधू या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत वैष्णवी रेड्डी ही महिला एकेरीत दुसरी फेरी गाठणारी एकमेव भारतीय ठरली. तिने इंग्लंडची जाजीना ब्लेंड हिच्यावर १९-२१,२१-१५,२१-१५ ने विजय नोंदविला.पुरुष दुहेरीत मनु अत्री-बी. सुमित रेड्डी यांनी लुकास डेफोल्की-मायकेल फरिमन यांचा २१-११, २१-१० ने तसेच श्लोक रामचंद्रन-अर्जुन एम.आर. यांनी रेमंड टेम-एरिक वुयोग यांचा २१-७,२१-१५ ने पराभव केला.

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा