तुम्ही 'या' स्कूटर्स ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय चालवू शकता, किंमत सुद्धा जास्त नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 11:42 AM2024-01-06T11:42:31+5:302024-01-06T11:43:09+5:30

वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल लोकांना मोठा दंड (चालान) भरावा लागत आहे.

You can drive 'these' scooters without a driving license, the price is not too high | तुम्ही 'या' स्कूटर्स ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय चालवू शकता, किंमत सुद्धा जास्त नाही

तुम्ही 'या' स्कूटर्स ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय चालवू शकता, किंमत सुद्धा जास्त नाही

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल केले आहेत. तेव्हापासून वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल लोकांना मोठा दंड (चालान) भरावा लागत आहे. अनेकवेळा असे घडते की, तुम्ही दुचाकी घेऊन बाहेर जाताना, तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स असलेले पाकीट घरीच विसरता.

अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांनी पकडल्यास चालान भरावे लागते. याच पार्श्वभूमीवर आम्ही तुमच्यासाठी अशा काही इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांना रस्त्यावर चालण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही.

Okinawa Lite
Okinawa Lite इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 250w मोटर आहे. या स्कूटरची स्पीड ताशी 25 किमी आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरद्वारे तुम्ही सिंगल चार्जमध्ये 60 किमीपर्यंतचे अंतर कापू शकता. जर तुम्हाला Okinawa Lite इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर तुम्ही ती 66,993 रुपयांना खरेदी करू शकता.

Komaki XGT KM
Komaki XGT KM या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 56,890 रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 60v ची 28Ah बॅटरी आहे, जी 65 किमीची रेंज देते. या स्कूटरला चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे.

Hero Electric Optima LX Hero
Hero Electric Optima LX Hero ही देशातील सर्वात विश्वासार्ह इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही 51,440 रुपयांना खरेदी करू शकता. Hero Electric Optima LX मध्ये 48V-2Ah लीड ऍसिड बॅटरी आहे, जी 60 किमी पर्यंतची रेंज देते. हीरो इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास आहे.

'या' स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही
दरम्यान, नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, ज्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचा टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे, अशा स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही. तसेच, RTO मध्ये या इलेक्ट्रिक स्कूटर्सची नोंदणी करण्याची गरज नाही.

Web Title: You can drive 'these' scooters without a driving license, the price is not too high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.