ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली! Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:09 IST2025-11-11T19:09:15+5:302025-11-11T19:09:36+5:30
Yamaha Aerox Electric Range: इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या बाजारपेठेत मागे राहिलेली जपानी वाहन उत्पादक कंपनी यामाहाने अखेर याही बाजारात एन्ट्री केली आहे.

ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली! Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या बाजारपेठेत मागे राहिलेली जपानी वाहन उत्पादक कंपनी यामाहाने अखेर याही बाजारात एन्ट्री केली आहे. कंपनीने आपल्या Aerox 155 या मॅक्सी-स्कूटरचे इलेक्ट्रिक व्हर्जन Yamaha Aerox Electric (Aerox-E) सादर केले आहे. या स्कूटरची किंमत आणखी काही महिन्यांनी म्हणजेच २०२६ मध्येच जाहीर केली जाणार असली तरी रेंज आणि इतर फिचर्स कंपनीने आजच सांगून टाकले आहेत.
या स्कूटरची रचना पेट्रोल स्कूटर सारखीच असली तरी, ती पूर्णपणे इलेक्ट्रिक मोटरवर चालते. या स्कूटरची प्रमाणित रेंज १०६ किलोमीटर इतकी असल्याचा दावा कंपनीने केला आहे, ज्यामुळे दैनंदिन वापरासाठी ही स्कूटर एक उत्तम पर्याय ठरू शकते.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान
Yamaha Aerox Electric मध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ती स्पोर्टी आणि कार्यक्षम ठरते. या स्कूटरमध्ये ९.४ किलोवॅटची मोटर असून, ती ४८ Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. स्मार्ट की सिस्टीम,ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी तसेच टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह ५-इंच TFT स्क्रीन देण्यात आली आहे.
बॅटरी पॅक...
या स्कूटरमध्ये ३ kWh क्षमतेचे बॅटरी पॅक वापरण्यात आले आहे. ही ड्युअल बॅटरी असणार असून ती चार्जिंगसाठी काढता येणारी आहे. यामुळे ती घरी चार्ज करता येणार आहे. बॅटरीचे एक पॅक ३ तास १० मिनिटांत चार्ज होते.
राइड मोड
या स्कूटरमध्ये गरजेनुसार यात तीन राइड मोड Eco, Standard, आणि Power देण्यात आले आहेत. यासोबतच जलद वेग पकडण्यासाठी 'बूस्ट' फंक्शन देखील देण्यात आले आहे. रिव्हर्स मोडही देण्यात आला आहे. पावर प्लस बुस्ट मोडमध्ये ही स्कूटर १०० किमी प्रति तासाचा वेग पकडते.
यामाहा ती चूक नाही करणार...
यामाहा इतर कंपन्यांनी केलेली चूक करणार नाहीय. आधी सर्व्हिस देण्यासाठी मेकॅनिकना ट्रेनिंग दिले जाणार आहे. यानंतरच ही स्कूटर भारतात विकण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ओला, बजाज चेतक सारख्या कंपन्यांनी सर्व्हिसबाबतीत कहर केलेला आहे. यामुळे इलेक्ट्रीक स्कूटर घेणारा ग्राहक बऱ्यापैकी त्रस्त झालेला आहे. यामाहा हीच चूक करणार नसून पूर्वतयारी करूनच बाजारात उतरणार आहे.