Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय यामाहाची नवीन बाईक, लवकरच भारतात होणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 04:04 PM2023-05-09T16:04:52+5:302023-05-09T16:05:22+5:30

सध्या, जपानी दुचाकी कंपनी 250 सीसी सेगमेंटमध्ये FZ25 आणि FZS25 विकते. मात्र, आता कंपनीने रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी नवीन बाईक आणण्याची तयारी केली आहे.

yamaha rd350 to be launched soon against royal enfield rz350 yamaha rz250 auto  | Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय यामाहाची नवीन बाईक, लवकरच भारतात होणार एंट्री

Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय यामाहाची नवीन बाईक, लवकरच भारतात होणार एंट्री

googlenewsNext

भारतातील मिडलवेट सेगमेंट मोठ्या वेगाने वाढत आहे. हा ट्रेंड आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता आहे. रॉयल एनफिल्डच्या बाईक्सचे या सेगमेंटमध्ये सर्वाधिक वर्चस्व आहे. चेन्नईस्थित रॉयल एनफिल्ड दुचाकी कंपनीचा बाजाराच्या तीन चतुर्थांश भागावर कब्जा आहे. आता यामाहाचीही नजर या सेगमेंटवर आहे. सध्या, जपानी दुचाकी कंपनी 250 सीसी सेगमेंटमध्ये FZ25 आणि FZS25 विकते. मात्र, आता कंपनीने रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी नवीन बाईक आणण्याची तयारी केली आहे.

Hero-Harley आणि Bajaj-Trump देखील मिडलवेट सेगमेंटमध्ये नवीन बाईक्स सादर करण्याच्या तयारीत आहेत. भारतासह जागतिक बाजारपेठेत रेट्रो-स्टाईल बाईकची मागणी वाढत आहे. दुचाकी कंपन्यांनीही पूर्णपणे नवीन मॉडेल सादर केले आहेत. तसेच, काही कंपन्या जुन्या लोकप्रिय बाईक्स नव्या अवतारात सादर करत आहेत. यामाहा देखील त्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने अलीकडे जपानमध्ये RZ350 आणि RZ250 साठी ट्रेडमार्क दाखल केला आहे. रेट्रो-बाइकची क्रेझ पाहता, कंपनी RZ350 आणि RZ250 भारतातही लॉन्च करू शकते.

भारतात 1980 आणि 90 च्या दशकात RD350 विकली गेली. क्लासिक डिझाइन आणि दमदार कामगिरीमुळे ही बाईक खूप लोकप्रिय झाली होती. आजही त्याची काही मॉडेल्स चालू स्थितीत आहेत. भारतात RD350 ला खूप फॅन फॉलोइंड आहे. ही बाईक पुन्हा भारतात लॉन्च झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी यामाहाला उच्च क्षमतेची रेट्रो बाईक घेऊन यावे लागेल हेही खरे आहे. Yamaha RD350 ही माडर्न क्लासिक बाईक म्हणून लॉन्च केली जाऊ शकते. 350 सीसी सेगमेंटमध्ये बाईक रॉयल एनफिल्ड बाईक, Honda Hness CB350, Jawa, Yezdi, आगामी Bajaj-Triumph आणि Hero-Harley यांना टक्कर देऊ शकते.

संभाव्य फीचर्स
यामध्ये 6 स्पीड गिअरबॉक्ससह 347 सीसी एअर कूल इंजिन दिले जाऊ शकते. बाईक्या परफॉर्मेंससाठी फोर-स्ट्रोक इंजिन मिळण्याची शक्यता आहे. फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन बाईकमध्ये DRL सह एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ड्युअल-चॅनल एबीएस, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि असिस्ट आणि स्लिपर क्लच यांचा समावेश असू शकतो.

Web Title: yamaha rd350 to be launched soon against royal enfield rz350 yamaha rz250 auto 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.