Yamaha च्या चाहत्यांसाठी खुशखबर; कंपनी सर्व गाड्यांवर देणार 10 वर्षांची वॉरंटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:16 IST2025-05-16T16:15:43+5:302025-05-16T16:16:15+5:30

Yamaha India: यामाहाने आपल्या सर्व बाईक आणि स्कूटर्सवर 10 वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे.

Yamaha India: company will offer 10 years warranty on all its bikes | Yamaha च्या चाहत्यांसाठी खुशखबर; कंपनी सर्व गाड्यांवर देणार 10 वर्षांची वॉरंटी...

Yamaha च्या चाहत्यांसाठी खुशखबर; कंपनी सर्व गाड्यांवर देणार 10 वर्षांची वॉरंटी...


Yamaha India: यामाहा गाड्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. यामाहा मोटर्स इंडियाने त्यांच्या सर्व स्कूटर आणि बाईकवर 10 वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे. या 10 वर्षांच्या वॉरंटीमध्ये 2 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी आणि 8 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी असेल. यात इंजिन आणि फ्यूल इंजेक्शन आणि इलेक्ट्रिकल एलिमेंट्स कव्हर होतील. सध्या स्कूटरवर 1,00,000 किलोमीटरपर्यंतची वॉरंटी मिळते, पण आता भारतात बनवलेल्या गाड्यांवर 1,25,000 किलोमीटरपर्यंतची वॉरंटी मिळेल.

स्कूटरसाठी सध्या स्डँडर्ड वॉरंटी 24,000 किमी अन् एक्सटेंडेड 76,000 किमी आहे. तर, बाईक्ससाठी स्डँडर्ड वॉरंटी 30,000 किमी असून, एक्सटेंडेड वॉरंटी 95,000 किमी आहे. यामाहाच्या हायब्रिड स्कूटर रेंजमध्ये रे झेडआर फाय, फॅसिनो 125 फाय आणि एरोक्स 155 मॅक्सी-स्कूटर यांचा समावेश आहे. तर, भारतात बनवलेल्या बाईकच्या रेंजमध्ये एफझेड सीरीज, आर15, एमटी-15, एमटी-03 आणि YZF-R3 आहे.

अपडेटेड स्कूटर लॉन्च 
2025 यामाहा एरोक्स 155 एस मध्ये अलीकडेच नवीन रंग पर्याय जोडले गेले आहेत. नवीन उत्सर्जन मानकांची पूर्तता करण्यासाठी ही आता OBD2 इंजिनने सुसज्ज आहे. नवीन रंगांमध्ये आइस फ्लुओ व्हर्मिलियन आणि रेसिंग ब्लू यांचा समावेश आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत ₹1,53,430 आहे, तर सध्याचा मेटॅलिक ब्लॅक व्हेरिएंट एक्स-शोरूम किंमत ₹1,50,130 आहे. 

शक्तिशाली इंजिन 
यामाहा एरोक्स 155 मध्ये लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक SOHC, 155 सीसी इंजिन आहे, जे 8,000 आरपीएम वर 14.8 बीएचपीचा कमाल पॉवर आउटपुट आणि 6,500 आरपीएम वर 13.9 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. या स्कूटरमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्सदेखील दिले आहेत.

Web Title: Yamaha India: company will offer 10 years warranty on all its bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.