Yamaha चा धमाका! गुपचूप लॉन्च केली स्वस्तातली स्कूटर, Honda Activa चं टेन्शन वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 04:56 PM2023-01-18T16:56:42+5:302023-01-18T17:01:54+5:30

Yamaha Grand Filano 125cc: भारतात फसिनोची किंम्मत जवळफास 79 हजार रुपये ते 90 हजार रुपये एवढी आहे. ग्रँड फिलानोचा लूक अत्यंत आकर्षक आहे. फसिनोच्या तुलनेत ही अधिक प्रीमियम आहे.

Yamaha grand filano 125cc scooter launch in indonesia the tension of Honda Activa will increase! | Yamaha चा धमाका! गुपचूप लॉन्च केली स्वस्तातली स्कूटर, Honda Activa चं टेन्शन वाढणार!

Yamaha चा धमाका! गुपचूप लॉन्च केली स्वस्तातली स्कूटर, Honda Activa चं टेन्शन वाढणार!

googlenewsNext

Yamaha ने आपली Grand Filano 125cc स्कूटर लॉन्च केली आहे. मात्र, ही स्कूटर भारतात नव्हे तर इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ती भारतात आली तर तिचा सामना थेट Honda Activa 125cc सोबत असेल. पण अद्याप तिच्या भारतात लॉन्च करण्यासंदर्भात कुठलीही माहिती नाही. 

इंडोनेशियामध्ये हिच्या निओ व्हेरिअंटची (बेस) किंमत IDR 27 मिलियन (जवळपास 1.46 लाख रुपये, ऑन रोड) तर लक्स व्हेरिअंटची किंमत IDR 27.5 मिलियन (जवळपास 1.48 लाख रुपये, ऑन रोड) एवढी आहे. ही स्कूटर भारतात विकल्या जाणाऱ्या यामाहा फसिनोचे अपग्रेड व्हर्जन सारखेच वाटते.

भारतात फसिनोची किंम्मत जवळफास 79 हजार रुपये ते 90 हजार रुपये एवढी आहे. ग्रँड फिलानोचा लूक अत्यंत आकर्षक आहे. फसिनोच्या तुलनेत ही अधिक प्रीमियम आहे. एलईडी हेडलाईटसह हिच्या अॅप्रॉनवर डायमंड-शेप्ड व्हर्टिकल एलईडी एलिमेंट आहेत. जे दिसायला अत्यंत आकर्षक वाटतात. हिला व्हर्टिकल एलईडी टेललाईट आणि एलईडी इंडीकेटरही देण्यात आले आहे. हिच्या सोबत हॅजर्ड लाईट फंक्शनही ऑफर करण्यात आले आहे. खरे तर, संपूर्ण स्कूटरवरच क्रोम एलिमेंट नही. या ऐवजी, स्पोर्टी अपील जोडण्यासाठी काही एलिमेंट्सना ब्लॅक कलरमध्ये ठेवण्यात आले आहे.

हिच्यासोबत माइल्ड-हायब्रिड टेक्नॉलॉजीसोबत 125cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे जवळपास 8 bhp आणि 10.4 Nm आऊटपुट देते. हा सेटअप भारतात विकल्या जाणाऱ्या फसिनोमध्येही मिळतो. यात स्टार्ट/स्टॉप फंक्शनही आहे. यात फ्रंट अॅप्रॉन-माउंटेड फ्यूअल फिलर कॅप मिळते. हिची फ्यूअल टँक कॅपेसिटी 4.4 लिटर एवढी आहे. या स्कूटरमध्ये 27 लिटरचे बूट स्पेस मिळते. गॅजेट्स चार्ज करण्यासाठी फ्रंट अॅप्रॉनमध्ये 12V चार्जिंग सॉकेटही आहे. यात 12 इंचाचे अलॉय व्हील मिळतात.

Web Title: Yamaha grand filano 125cc scooter launch in indonesia the tension of Honda Activa will increase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.