Yamaha FZ-S FI V4 ला मिळाले आणखी दोन कलर ऑप्शन, किंमत 1.28 लाखांपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 04:11 PM2023-10-04T16:11:48+5:302023-10-04T16:12:10+5:30

Yamaha FZ-S FI V4 नवीन कलर ऑप्शनमध्ये 1.28 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम, दिल्ली)  खरेदी केली जाऊ शकतो.

yamaha fz s fi v4 gets two new colour options | Yamaha FZ-S FI V4 ला मिळाले आणखी दोन कलर ऑप्शन, किंमत 1.28 लाखांपासून सुरू

Yamaha FZ-S FI V4 ला मिळाले आणखी दोन कलर ऑप्शन, किंमत 1.28 लाखांपासून सुरू

googlenewsNext

नवी दिल्ली : इंडिया यामाहा मोटरने (India Yamaha Motor) आज आपल्या स्पोर्ट्स बाईक FZ-S FI V4 साठी नवीन कलर ऑप्शन जाहीर केले आहेत. हे आता दोन नवीन पेंट स्कीममध्ये उपलब्ध आहे. कंपनीने याला डार्क मॅट ब्लू आणि मॅट ब्लॅक असे दोन नवीन कलर ऑप्शन दिले आहेत. दरम्यान, Yamaha FZ-S FI V4 नवीन कलर ऑप्शनमध्ये 1.28 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम, दिल्ली)  खरेदी केली जाऊ शकतो. या बाईकच्या इतर फीचर्सबद्दल जाणून घ्या...

Yamaha FZ-S FI V4 चे कलर ऑप्शन
कंपनीचे म्हणणे आहे की, सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना, FZ-S FI V4 मध्ये नवीन रंगसंगती सादर केल्याने यामाहाच्या संपूर्ण भारतातील विक्रीला नक्कीच चालना मिळेल. कंपनीने याला मॅट ब्लू आणि मॅट ब्लॅक असे दोन नवीन कलर ऑप्शन दिले आहेत. बाईक या कलर ऑप्शनसह 1.28 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, दिल्ली) किमतीत खरेदी केली जाऊ शकते. यामाहाने आता FZ-S FI V4 ला डार्क मॅट ब्लू (नवीन), मॅट ब्लॅक (नवीन), मेटॅलिक ग्रे, मॅजेस्टी रेड आणि मेटॅलिक ब्लॅक या पाच कलरमध्ये आणले आहे.

Yamaha FZ-S FI V4 चे इंजिन
परफॉरमेंसबद्दल बोलायचे झाले तर, यामाहा FZ-S FI V4 हे मुळात 149 सीसी इंजिनद्वारे संचालित आहे, जे 7,250 आरपीएमवर 12.2 एचपीच्या कमाल पॉवर आणि 5,500 आरपीएमवर 13.3 एनएम पीक टॉर्क निर्माण करते.

Yamaha FZ-S FI V4 चे फीचर्स
दरम्यान, Yamaha FZ-S FI V4 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकमध्ये मल्टी-फंक्शन एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी हेडलॅम्प, रिअर  डिस्क ब्रेकसह सिंगल-चॅनल एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) आणि ब्लूटूथ-इनेबल्ड Y-Connect अॅप देण्यात आले आहे.

Web Title: yamaha fz s fi v4 gets two new colour options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.