Xiaomi to Invest cny 10 Billion in New Electric Vehicle Unit Over 10 Years | भारताच्या स्मार्टफोन बाजारपेठेत 'धुमशान' करणारी कंपनी बनवणार 'इलेक्ट्रिक कार'; ११ हजार कोटी गुंतवणार

भारताच्या स्मार्टफोन बाजारपेठेत 'धुमशान' करणारी कंपनी बनवणार 'इलेक्ट्रिक कार'; ११ हजार कोटी गुंतवणार

भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेत स्वस्त आणि मस्त उत्पादनं लॉन्च करून बलाढ्या कंपन्यांना धक्का देणारी शाओमी कंपनी (Xiaomi  आता इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) निर्मितीत पाऊल टाकणार आहे. शाओमी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात येणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. (Xiaomi to Invest cny 10 Billion in New Electric Vehicle Unit)

शाओमी ग्लोबलनं एका ट्विटच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील पदार्पणाबद्दल माहिती दिली आहे. कंपनीनं त्यांच्या उत्पादनाबद्दल नेमकी माहिती दिलेली नाही. स्मार्ट वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा सविसतर तपशील लवकरच दिला जाईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. शाओमी इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात पुढील १० वर्षांत १० बिलियन डॉलरची (जवळपास ११ हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. यासाठी शाओमी एक सबसिडरी तयार करणार आहे.

Video पाहून चकित व्हाल! Alibabaची एका चाकावर चालणारी ईलेक्ट्रीक बाईक लाँच

स्मार्ट इलेक्ट्रिक व्यवसायाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी लेई जुन यांच्याकडेच असेल. जुनच शाओमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सुरुवातीला शाओमी इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात १० बिलियन चिनी युआनची गुंतवणूक करेल. त्यानंतर पुढील १० वर्षांत १० बिलियन डॉलरची गुंतवणूक केली जाईल. स्मार्ट इलेक्ट्रिक वाहन जगतात प्रत्येकाला स्मार्ट लिव्हिंगचा ऍक्सेस कुठेही मिळावा, हा आमचा हेतू असल्याचं शाओमीनं सांगितलं आहे.

केंद्राची नवी योजना! ४ कोटी वाहनांवर ग्रीन टॅक्स लावणार; प्रस्ताव राज्यांना पाठवला

शाओमी ग्रेट वॉलसोबत इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन करणार असल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. ग्रेट वॉल मोटर्स चीनमधील मोठी कंपनी आहे. चीनच्या भिंतीवरून कंपनीचं नामकरण करण्यात आलं. ग्रेट वॉल मोटर्स आणि शाओमी यांच्या भागीदारीचं स्वरूप नेमकं कसं असणार याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

Web Title: Xiaomi to Invest cny 10 Billion in New Electric Vehicle Unit Over 10 Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.