Wuling Hong Guang या इलेक्ट्रीक कारनं Tesla लादेखील टाकलं मागे; बनली जगातील बेस्ट सेलिंग कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 21:37 IST2021-03-22T21:34:17+5:302021-03-22T21:37:44+5:30
Electric Vehicle : इतर इलेक्ट्रीक गाड्यांच्या तुलनेत किंमतही आहे कमी

Wuling Hong Guang या इलेक्ट्रीक कारनं Tesla लादेखील टाकलं मागे; बनली जगातील बेस्ट सेलिंग कार
जगभरात आता ग्राहकांना इलेक्ट्रीक वाहनांकडे कल मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशातच अमेरिकेती वाहन उत्पादक कंपनी टेस्ला ही जगात इलेक्ट्रीक कार्सच्या सेगमेंटमध्ये लोकप्रिय आहे. परंतु चीनची एक वाहन उत्पादन कपंनी SAIC ची छोटी इलेक्ट्रीक कार Hong Guang च्या विक्रीनं टेस्ललाही मागे सोडलं आहे. ही मिनी कार आता जगातील बेस्ट सेलिंग इलेक्ट्रीक कार बनली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार Hong Guang गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात टेस्लाची बेस्ट सेलिंग कार Model 3 ला मागे टाकलं. जानेवारी महिन्यात या कारच्या30 हजार युनिट्सची विक्री झाली. तर या दरम्यान टेस्लाच्या Model 3 या कारच्या 21,500 य़ुनिट्सची विक्री झाली. तर फेब्रुवारी महिन्यात Hong Guang या गाडीच्या 20 हजार तर टेस्लाच्या 13,700 युनिट्सची विक्री झाली.
साईझ, ड्रायव्हिंग रेंज आणि परफॉर्मन्समध्ये टेस्लाच्या तुलनेत ही कार तितकी प्रभावी नसली तरी ही कार फार लोकप्रिय होत आहे. टेस्ला आणि इतर इलेक्ट्रीक गाड्यांच्या तुलनेत या गाडीची किंमत कमी असणं हे याला अधिक लोकप्रिय बनवतं. Hong Guang या गाडीचं वजन केवळ 665 किलो आहे. तसंच एका चार्जमध्ये ही कार 170 किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. तसंच या कारचा सर्वाधिक वेग 100 किलोमीटर प्रति तास इतका आहे. चीनच्या या कारची किंमत 28,800 युआन म्हणजेच जवळपास 4,500 डॉलर्सच्या जवळपास आहे. तर टेस्लाच्या Model 3 ची सुरूवातीची किंमत 38,190 डॉलर्स इतकी आहे.