अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:38 IST2025-11-12T17:38:07+5:302025-11-12T17:38:47+5:30
आपण पुढील काही दिवसांत आपल्या कुटुंबासाठी एखादी 7-सीटर एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी खास आपल्यासाठी आहे....

अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
जर आपण पुढील काही दिवसांत आपल्या कुटुंबासाठी एखादी 7-सीटर एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी खास आपल्यासाठी आहे. खरे तर, स्कोडा आपली ढासू 7-सीटर एसयूव्ही कोडियाकवर नोव्हेंबर, 2025 दरम्यान बंपर सूट देत आहे. या कालावधीत ग्राहक स्कोडा कोडियाक (Skoda Kodiaq) वर तब्बल 2.50 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळवू शकतात. या ऑफरमध्ये 1.50 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि इतर आकर्षक बेनिफिट्सचा समावेश आहे. या सवलतीसंदर्भात ग्राहक आपल्या जवळच्या स्कोडा डिलरशिपकडून अधिक माहिती मिळवू शकतात.
ढासू आहेत एसयूव्ही फीचर्स -
कोडियाक ही स्कोडाची प्रीमियम SUV असून तिच्या दमदार डिझाइनमुळे ती ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. या एसयूव्हीमध्ये रुंद क्रोम ग्रिल, शार्प LED हेडलाइट्स आणि आकर्षक लाइट बारसह हीचा फ्रंट लूक आकर्षक दिसतो. इंटीरियरमध्ये मोठा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, 360-डिग्री कॅमेरा आणि वेंटिलेटेड सीट्ससारखे प्रीमियम फीचर्स मिळतात.
कुछ ऐसा है पावरट्रेन
परफॉर्मन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, कोडियाकमध्ये 2.0-लिटर TSI पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 204 bhp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करते. या SUV मध्ये 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टम दिले आहे. यामुळे कोणत्याही रस्त्यावर उत्कृष्ट नियंत्रण मिळते.
किंमत किती...? -
भारतामध्ये स्कोडा कोडियाकची एक्स-शोरूम किंमत 46.89 लाख ते 48.69 लाख रुपयांपर्यंत आहे. या किंमतीत ती देशातील 7-सीटर प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये टोयोटा फॉर्च्यूनर आणि एमजी ग्लॉस्टरसारख्या कारना थेट टक्कर देते.