वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 21:25 IST2025-09-19T21:24:11+5:302025-09-19T21:25:38+5:30
या किंमत कपातीमुळे टाटा अल्ट्रोज बाजारातील, ह्युंदाई आय-२०, मारुती सुझुकी बलेनो आणि टोयोटा ग्लान्झा आदी प्रतिस्पर्धकांना थेट टक्कर देत आहे.

वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
टाटा मोटर्सने फेस्टिव्ह सीझनपूर्वीच आपल्या ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. कंपनीने आपल्या प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोजच्या (Tata Altroz) किमतीत जबरदस्त कपात केली आहे. भारत सरकारने जीएसटी (GST) दर कमी केल्याने, कंपनीने या कपातीचा थेट फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने अल्ट्रोजच्या विविध मॉडेल्सच्या किमतीत मोठी घट झाली आहे. या किंमत कपातीमुळे टाटा अल्ट्रोज बाजारातील, ह्युंदाई आय-२०, मारुती सुझुकी बलेनो आणि टोयोटा ग्लान्झा आदी प्रतिस्पर्धकांना थेट टक्कर देत आहे.
व्हेरिएंटनुसार सूट -
अल्ट्रोजच्या प्रत्येक व्हेरिएंटवर वेगवेगळी सूट देण्यात आली आहे. सर्वात कमी सूट म्हणजेच ₹५९,०००, ही सूट अल्ट्रोज स्मार्ट १.२ मॉडेलवर देण्यात आली आहे, तर सर्वाधिक ₹९८,००० ची सूट अल्ट्रोज अकॉम्प्लिश्ड+ एस डीसीए १.२ या टॉप-एंड व्हेरिएंटवर मिळत आहे.
नवीन फीचर्स आणि डिझाइन -
या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. यामुळे ही कार अधिक आकर्षक बनली आहे. नवीन डिझाइनमध्ये दिवसा चालू राहणारे लाइट्स (DRL), पूर्ण-LED स्प्लिट हेडलाइट्स, एक नवीन ग्रिल, नव्याने डिझाइन केलेला बंपर आणि १६-इंच ५-स्पोक अलॉय व्हील्सचा समावेश आहे.
कारच्या आतील वैशिष्ट्ये - कारच्या कॅबिनमध्ये १०.२५-इंच ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो एसी कंट्रोल, इलेक्ट्रिक सनरूफ, क्रूझ कंट्रोल आणि ३६०-डिग्री कॅमेरा यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
सुरक्षिततेला सर्वोधिक प्राधान्य -
टाटा अल्ट्रोज तिच्या मजबूत बांधणीसाठी आणि सुरक्षिततेसाठी ओळखली जाते. या कारला भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. किंमतीतील कपात आणि या उच्च सुरक्षा रेटिंगमुळे अल्ट्रोज खरेदीदारांसाठी एक अत्यंत आकर्षक पर्याय ठरू शकते.
इंजिन पर्याय:
अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच १.२-लीटर पेट्रोल, १.५-लीटर डिझेल आणि सीएनजी असे तीन पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार इंजिनची निवड करू शकतात.