शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

भारतात येतेय जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; 100 च्या स्पीडने पळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 16:34 IST

बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याचबरोबर आखातातील युद्धसदृष्य स्थितीही इंधनाच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत.

नवी दिल्ली : बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याचबरोबर आखातातील युद्धसदृष्य स्थितीही इंधनाच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत. अशावेळी एकच पर्याय समोर दिसत आहे. तो म्हणजे इलेक्ट्रीक वाहनांचा. सरकारनेही याचा पिच्छा पुरविला आहे. मात्र, सध्याच्या कारच्या किंमती पाहता या कार सामान्यांपासून कोसो दूरच आहेत. पण चीनची सर्वात मोठी कंपनी यंदा भारतात सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार उतरवून धमाका करणार आहे. 

फेब्रुवरीमध्ये होणाऱ्या Auto Expo मध्ये Great Wall Motors (GWM) ही कंपनी एसयुव्ही कारसोबत जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार म्हणून प्रसिद्ध असलेली Ora R1 दाखविणार आहे. ही कार दिसायला छोटी असली तरीही तिचे कारनामे मोठे आहेत. 

साधारण अल्टो किंवा क्विडच्या आकाराची ही कार एका चार्जिंगमध्ये तब्बल 351 किमीचे अंतर तोडणार आहे. तर या कारचा सर्वाधिक वेग 100 किमी प्रती तास असणार आहे. ओरा आर1 मध्ये 35 किलो वॉटची मोटार देण्यात आली आहे. कंपनी ही कार यंदाच लाँच करण्याच्या तयारीत असून तीन वर्ष किंवा 1.20 लाख किमी तसेच 8 वर्षे किंवा 1.5 लाख किमी मोफत सर्व्हिसिंग देण्याची शक्यता आहे. या कारची किंमत सर्वांना धक्का देणारी आहे. भारतीय बाजारात ही कार 6.23 लाख ते ८ लाख रुपयांमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. तसेच यावर सरकारकडून सबसिडीही मिळण्याची शक्यता आहे. 

ग्रेट वॉल मोटर्स ORA ब्रँड अंतर्गत तीन इलेक्ट्रीक कार R1, R2 and iQ या विकते. Ora R1 आर्टिफिशियल इंटेलिजेंस फीचरने लेस असणार आहे. शिवाय कनेक्टिव्हीटी फिचरही दिले जाणार आहे. कारचा मालक ही कार "Hello, Ora" बोलूनही सुरू करू शकणार आहे.

 

टॅग्स :great wall motorsग्रेट वॉल मोटर्सElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन