World Most Expensive Car: जगभरात दर काही महिन्यांनी नवनवीन लक्झरी कार्स लॉन्च होत असतात, परंतु काही ठराविक गाड्यांची चर्चा होते. अशीच एक गाडी सध्या चर्चेत आली आहे. ही गाडी Rolls-Royce La Rose Noire Droptail आहे. ही जगातील सर्वात महागडी कार ठरली आहे.
किंमत ऐकून चकित व्हाल!
ही कार जगातील सर्वात महागडी कार मानली जात आहे. ब्रिटनमधील रोल्स-रॉयस कंपनीने ही लिमिटेड एडिशन सुपरलक्झरी कार ऑगस्ट 2023 मध्ये ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केली होती. या कारची किंमत जवळपास 30 मिलियन अमेरिकन डॉलर, म्हणजेच भारतीय चलनात तब्बल 211 कोटी रुपये इतकी आहे.
दमदार परफॉर्मन्स आणि डिझाईन
La Rose Noire Droptail ही दोन आसनी (2-seater) सुपरलक्झरी कार आहे. या कारमध्ये 6.75 लिटर ट्विन-टर्बो V12 इंजिन देण्यात आले आहे, जे 563 बीएचपीची पॉवर आणि 820 एनएम टॉर्क निर्माण करते. कार्बन फायबर, स्टील आणि अॅल्युमिनियम बॉडीमुळे ही कार हलकी पण अत्यंत मजबूत आहे.
डिझाईन आणि कलरची खासियत
या कारचं आकर्षण केवळ तिच्या किंमतीत नाही, तर तिच्या डिझाईन आणि कलर ट्रान्झिशनमध्ये आहे. वेगवेगळ्या अँगलमधून पाहिल्यास कारच्या बॉडीवर रंग बदलताना दिसतो. हे फिनिश मिळवण्यासाठी कंपनीने तब्बल 150 पेक्षा जास्त पेंट टेस्ट्स केल्या आहेत.
La Rose Noire Droptail चं डिझाईन फ्रान्समधील Black Baccara Rose या विशेष गुलाबाच्या पाकळ्यांवर आधारित आहे. म्हणूनच या कारचं नावही त्या गुलाबावरून ठेवण्यात आलं आहे. La Rose Noire, म्हणजेच “काळा गुलाब!”
Web Summary : Rolls-Royce La Rose Noire Droptail, a limited edition super-luxury car, is now world's most expensive. Priced at $30 million (₹211 crore), this 2-seater boasts a 6.75-liter twin-turbo V12 engine, unique color-shifting paint, and a design inspired by the Black Baccara Rose.
Web Summary : रोल्स-रॉयस ला रोज नोइर ड्रॉपटेल, एक सीमित संस्करण सुपर-लक्जरी कार, अब दुनिया की सबसे महंगी है। 30 मिलियन डॉलर (₹211 करोड़) की कीमत वाली, इस 2-सीटर में 6.75-लीटर ट्विन-टर्बो V12 इंजन, अनोखा रंग बदलने वाला पेंट और ब्लैक बकारा रोज से प्रेरित डिजाइन है।