एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:28 IST2025-08-04T16:27:08+5:302025-08-04T16:28:36+5:30

EV Sale MG, Tata Electric Sale: जुलै २०२५ मध्ये देशात इलेक्ट्रीक पॅसेंजर गाड्यांची एकूण विक्री १५३०० वर गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ९१ टक्के एवढी प्रचंड आहे. एमजीला विंडसर ईव्हीने मोठा हात दिला आहे. जूनच्या तुलनेत या महिन्यात ईव्हींची विक्री १० टक्क्यांनी वाढली आहे.

Will MG overtake Tata one day? This much electric car sold in July 2025... Hyundai Creta... | एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...

एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...

जुलै महिन्याने इलेक्ट्रीक वाहनांना सुगीचे दिवस दाखविले आहेत. नेहमीप्रमाणे टाटा एक नंबर राहिली असली तरी एमजीने जोरदार मुसंडी मारली आहे. जुलैमध्ये ९१ टक्क्यांनी इलेक्ट्रीक वाहनांची विक्री वाढली आहे. टाटाची हॅरिअर आणि एमजीची एम९ आणि सायबरस्टर या कार ऑगस्टपासून धुमाकूळ घालणार आहेत. 

जुलै २०२५ मध्ये देशात इलेक्ट्रीक पॅसेंजर गाड्यांची एकूण विक्री १५३०० वर गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ९१ टक्के एवढी प्रचंड आहे. एमजीला विंडसर ईव्हीने मोठा हात दिला आहे. जूनच्या तुलनेत या महिन्यात ईव्हींची विक्री १० टक्क्यांनी वाढली आहे. 

टाटा मोटर्सने ५,९७२ इलेक्ट्रिक वाहने विकली आहेत. तर JSW MG ने ५,०१३ युनिट कारची विक्री केली आहे. महिंद्राला फारसे काही करता आलेले नाही. ही कंपनी गेली कित्येक वर्षे ईलेक्ट्रीक कार विकत आहे. भारतातील सर्वात पहिली ईव्ही कार विकणारी कंपनी महिंद्राच आहे. परंतू, नंतर येऊन टाटा आणि एमजीने कहर केला आहे. महिंद्राला जुलैमध्ये  2,789 कारच विकता आल्या आहेत. जूनच्या तुलनेत १३ टक्क्यांनी विक्री घसरली आहे. 

या खालोखाल ह्युंदाई: ६०२, BYD: 453, BMW: 225, मर्सिडीज-बेंझ: ८५ आणि सिट्रॉएन : 41 या कंपन्यांनी कार विकल्या आहेत. सध्याच्या घडीला टाटा आणि एमजीच्या ताफ्यात जास्त ईव्ही कार आहेत. ह्युंदाईला क्रेटा ईव्हीमध्ये आणूनही फारसे यश मिळताना दिसत नाहीय. बीवायडीच्या कारच्या किंमती या खूपच महाग आहेत. 

Web Title: Will MG overtake Tata one day? This much electric car sold in July 2025... Hyundai Creta...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.