शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

BMW C 400 GT : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी भारतात लाँच होणार BMW ची पहिली स्कूटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 16:20 IST

BMW C 400 GT India launch date out: C400GT मध्ये पॉवरफुल इंजिन या प्रीमियम स्कूटरमध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते.

ठळक मुद्देया स्कूटरची बुकिंग आधीच सुरू आहे आणि तुम्ही या स्कूटरची प्री-बुकिंग 1 लाख रुपयांचे टोकन भरून करू शकता.

नवी दिल्ली : जर तुम्ही एका चांगल्या स्कूटरची वाट पाहत असाल तर 12 ऑक्टोबर रोजी ही प्रतीक्षा संपणार आहे. जर्मन वाहन निर्मिता कंपनी बीएमडब्ल्यू मोटरराड इंडियाने (BMW Motorrad India) सांगितले की,  BMW C400GT Maxi Scooter भारतात विक्रीसाठी  12 ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल. कंपनीने सोशल मीडियाद्वारे याची पुष्टी केली आहे. (bmw c400gt maxi scooter launch india 12 october)

दरम्यान, BMW मोटरराड इंडियाने म्हटले आहे की,12 ऑक्टोबर रोजी BMW C400GT Maxi Scooter भारतीय बाजारात लॉन्च करण्यात येईल. मात्र, या स्कूटरची बुकिंग आधीच सुरू आहे आणि तुम्ही या स्कूटरची प्री-बुकिंग 1 लाख रुपयांचे टोकन भरून करू शकता.

भारतीय बाजारात या स्कूटरची टक्कर सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट 125 आणि एप्रिलिया एसएक्सआर 160 शी होणार आहे. दरम्यान, C400GT शी स्पर्धा करण्यासाठी, होंडा लवकरच भारतीय बाजारात फोर्झा 350 लाँच करू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

तज्ज्ञांच्या मते, आपल्या सेगमेंटमध्ये C400GT भारतीय बाजारपेठेत सर्वात प्रीमियम स्कूटर असेल. जोपर्यंत किंमतीबाबत सांगायचे झाल्यास आहे, कंपनीने याबाबत उघड केले नाही, परंतु अंदाज असा लावला जात आहे की, या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 5 लाख ते 7 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

पॉवरफुल इंजिनC400GT मध्ये पॉवरफुल इंजिन या प्रीमियम स्कूटरमध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते. जे सीव्हीटी ट्रान्समिशनसह येते. हे इंजिन 33.5bhp पॉवर आणि 35Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये राईड-बाय-वायर-थ्रॉटल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि राइडिंग मोड यासारखी अनेक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

मस्क्युलर बॉडी याचबरोबर, C400GT ला मस्क्युलर बॉडी पॅनेलसह संपूर्ण मॅक्सी-स्कूटर बॉडी किट देण्यात आली आहे. यामध्ये उंच विंडस्क्रीन, पुल-बॅक हँडलबार, एक मोठे स्टेप्ड सीट, ड्युअल फूटरेस्ट, फुल-एलईडी लाइटिंग, कीलेस इग्निशन, हीटेड ग्रिप्स, हीटेड सीट, एबीएस, अँटी-थेफ्ट अलार्म सिस्टम आणि एक ब्लूटूथ-इनेबल्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे.

टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यूAutomobileवाहनbusinessव्यवसाय