VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 19:50 IST2025-09-09T19:49:59+5:302025-09-09T19:50:27+5:30

VinFast VF6 आणि VF7 या दोन्ही एसयुव्ही असून टाटा, महिंद्रा, एमजी सारख्या कंपन्यांना चांगलीच टक्कर देण्याची तयारी केली आहे. 

VinFast VF6, VF7 Launching: Tata, Mahindra, MG will gone! Winfast launches two cheap EVs; Prices start from 16.49 lakhs... | VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...

VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...

जागतीक बाजारपेठेत टेस्ला सारख्या कंपनीच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या व्हिएतनामच्या कंपनीने नुकत्याच दोन ईलेक्ट्रीक कार लाँच केल्या आहेत. VinFast VF6 आणि VF7 या दोन्ही एसयुव्ही असून टाटा, महिंद्रा, एमजी सारख्या कंपन्यांना चांगलीच टक्कर देण्याची तयारी केली आहे. 

१२.९-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हॉइस असिस्टंट, फिक्स्ड पॅनोरॅमिक ग्लास रूफ, ८-वे पॉवर-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम आणि अॅम्बियंट लाइटिंग, ओव्हर-द-एअर (ओटीए) अपडेट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, कीलेस एंट्री, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप आणि स्मार्टफोन अशी वैशिष्ट्ये VF6 मध्ये देण्यात आली आहेत. 

व्हीएफ ६ ही कार अर्थ, विंड आणि विंड इन्फिनिटी अशा तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 59.6 kWh बॅटरी पॅक देण्यात आले आहे. अर्थ प्रकार 177 PS आणि 250 Nm टॉर्क निर्माण करतो, तर विंड प्रकार 204 PS आणि 310 Nm टॉर्क निर्माण करतो. 0-80% चार्ज होण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतात.अर्थ प्रकार हा 468 किमीची रेंजचा दावा करण्यात आला आहे. विंड प्रकार 463 किमी पर्यंत रेंज देतो. अर्थ १६.४९, विंड १७.७९ आणि विंड इन्फिनिटी १८.२९ लाख रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. 

VF7 मध्ये काय काय...

तर VF7 या कारमध्ये अर्थ, विंड आणि स्काय व्हेरिअंट येणार आहेत. अर्थसाठी ५९.६ kWh बॅटरी, तर स्कायसाठी ७०.८kWh LFP बॅटरी देण्यात आली आहे. VF7 आणि त्याच्या बॅटरी पॅकला १० वर्षे किंवा २ लाख किमीची वॉरंटी देण्यात आली आहे. विनफास्ट त्यांच्या व्हीग्रीन्स चार्जर्सवर जुलै २०२८ पर्यंत मोफत चार्जिंग, ३ वर्षांसाठी मोफत देखभाल जाहीर केली आहे. अर्थ एफडब्ल्यूडी २०.८९, विंड एफडब्ल्यूडी २३.४९, विंड इन्फिनिटी एफडब्ल्यूडी २३.९९, स्काय एडब्ल्यूडी २४.९९, स्काय इन्फिनिटी एडब्ल्यूडी २५.४९ लाख रुपयांना मिळणार आहे. एका चार्जमध्ये ही कार 532km पर्यंत रेंज देते. 

Web Title: VinFast VF6, VF7 Launching: Tata, Mahindra, MG will gone! Winfast launches two cheap EVs; Prices start from 16.49 lakhs...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.