भारतीय बाजारात नुकतीच एन्ट्री करणारी व्हिएतनामी इलेक्ट्रिक वाहन निर्माता विनफास्टच्या अमेरिकेतील विस्ताराच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मोठा तडा गेला आहे. 'दर महिन्याला १ लाख वाहनांची विक्री' करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या या कंपनीला आता अमेरिकेत विक्रीतील अभूतपूर्व घसरणीला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे विनफास्टने स्वत:च्या डीलरशीप बंद करण्यास सुरुवात केली आहे.
विक्री अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाल्याने नॉर्थ करोलिनासह अनेक राज्यांतील डीलर्सनी कंपनीशी करार मोडण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, विनफास्टने एक अत्यंत अनपेक्षित घोषणा केली आहे: डीलर्सनी विक्री थांबवली तरी कंपनी स्वतः ग्राहकांना विक्रीपश्चात सेवा पुरवेल. तज्ज्ञांच्या मते, हे आश्वासन बाजारपेठेतील कंपनीच्या ढासळत्या विश्वासार्हतेचे आणि महत्त्वाकांक्षी स्वप्न तुटल्याचे स्पष्ट लक्षण आहे.
विक्रीत मोठी घसरणऑक्टोबर २०२५ पर्यंत विनफास्टने अमेरिकेत केवळ १,००० हून कमी वाहने विकली, ज्यामुळे कंपनी आपल्या वार्षिक विक्री ध्येयापासून ९०% पेक्षा जास्त मागे पडली आहे. या वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत, अमेरिकेत त्यांच्या फक्त १,४१३ वाहनांची नोंदणी झाली आहे. २०२४ मध्ये कंपनीला २.३ अब्ज डॉलरचा तोटा झाला. संस्थापक फॅम न्हात व्हुओंग यांनी $३ अब्जहून अधिक गुंतवणूक केली असूनही, कंपनीच्या शेअरची किंमत ७०% ने घसरली आहे.
अंतर्गत संकटेअमेरिकेचे सीईओ डेव्हिड हिल्टन यांच्यासह अनेक वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह्ह्जनी गेल्या वर्षभरात राजीनामे दिले आहेत. तसेच, पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे व्हिएतनाममधील उत्पादन क्षमता ५०% पर्यंत घसरली आहे.
किती डीलर कार्यरत..ऑटोन्यूजच्या एका अहवालानुसार, अमेरिकेत विनफास्टकडे सध्याच्या घडीला 22 डीलरशिप्स आहेत. परंतू, त्यापैकी 17 जणांकडेच विनफास्टच्या गाड्यांचा स्टॉक आहे. यापैकी एकाकडे २०२४ ची एकच व्हीएफ ८ कार पडून आहे. कंपनीचा विस्तार स्पष्टपणे तिला हवा तसा झाला नाही. सुरुवातीला त्यांनी १२५ डीलर्सशी करार करण्याची अपेक्षा केली होती आणि नंतर २०२४ च्या अखेरीस देशभरात शेकडो आउटलेट उघडण्याची योजना आखली होती. ऑगस्टपर्यंत, त्यांनी "जवळजवळ ३० अधिकृत डीलरशिप" असल्याचा दावा केला होता.
Web Summary : VinFast's US expansion falters with dealership closures amid poor sales. Despite investments and ambitious goals, the company faces losses, executive departures, and dwindling dealer presence, even while entering the Indian market.
Web Summary : भारत में प्रवेश करने के बीच, खराब बिक्री के कारण VinFast का अमेरिकी विस्तार लड़खड़ा रहा है। निवेश और महत्वाकांक्षी लक्ष्यों के बावजूद, कंपनी को नुकसान, अधिकारियों के इस्तीफे और डीलरशिप में कमी का सामना करना पड़ रहा है।